Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtra

मोदी सरकार सहाच महिन्यांचेच पाहुणे; नंतर पायउतार होणार!

– लोकसभा निवडणुकीचे भाकित ठरले होते खरे; विधानसभेत ‘महायुती’ची दाणादाण उडणार असल्याचेही सांगितले!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – केंद्रात सत्तेवर आलेले राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार हे फक्त सहाच महिन्याचे पाहुणे आहे. त्यानंतर ते कोसळणार आहे, असे भाकित बुलढाणा येथील प्रसिद्ध ज्योतिषकार दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी वर्तविले आहे. देशपांडे महाराजांनी यापूर्वी नरेंद्र मोदी हे लोकसभेत बहुमत प्राप्त करू शकणार नाही, असे भाकित लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्तवले होते, ते खरे ठरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीची दाणादाण उडणार असून, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिल्लक राहणार नाही, असेही देशपांडे महाराजांनी सांगितले आहे. ते आदिशक्तीचे साधकदेखील आहेत.

‘साम टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी यासंदर्भात विख्यात ज्योतिषी दत्तात्रय देशपांडे महाराजांची मुलाखत घेतलेली आहे. या मुलाखतीत देशपांडे महाराजांनी महत्वपूर्ण भविष्यवाणी केली आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार सहा महिनेही टिकू शकणार नाही, असे देशपांडे महाराज म्हणालेत. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतही ‘महायुती’चा धुव्वा उडेल. महाविकास आघाडीचे सर्वाधिक जागेवर उमेदवार निवडून येतील. अजित पवार यांच्या पक्षाचे नामोनिशाण राहणार नाही, असेही दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी सांगितले. यापूर्वीदेखील आदिशक्तीचे साधक तथा बुलढाणा येथील प्रसिद्ध ज्योतिष्यकार असलेल्या देशपांडे महाराज यांनी काही २८ मेरोजी मोठी भविष्यवाणी केली होती. लोकसभा निवडणूक निकालात भाजपला २३५ ते २४० आणि काँग्रेस आघाडीला २५५ पेक्षा जास्त मिळतील, असे ते म्हणाले होते. तसेच नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेसाठी तडजोड करावीच लागेल, असे भाकीतही त्यांनी केले होते. त्यांचा हा अंदाज खरा ठरलेला आहे. आता लोकसभा निकालानंतर त्यांनी पुन्हा नवीन भविष्यवाणी केली असून, नरेंद्र मोदी यांचे नवीन सरकार सहा महिन्यांच्यावर टिकू शकणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.


मोदी सरकार फक्त सहा महिने टिकेल. त्यानंतर ते कोसळणार आहे. येणार्‍या विधानसभेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या हातून सत्ता जाईल. तसेच अजित पवार यांच्या पक्षाचा दारुण पराभव होईल. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा विधानसभेत बोलबाला राहील.
– दत्तात्रय देशपांडे महाराज, ज्योतिषतज्ज्ञ तथा आदिशक्तीचे साधक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!