Breaking newsHead linesMaharashtraPoliticsWorld update
अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांचे खाते ‘रिपीट’; प्रतापराव जाधवांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
– एस. जयशंकर यांना विदेश तर शिवराज सिंह यांना कृषी मंत्रालयाची जबाबदारी
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमधील मंत्र्यांना आज सायंकाळी साडेसहा वाजता खातेवाटप जाहीर करण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाची जबाबदारी अमित शाह यांच्याकडेच कायम ठेवली आहे. तर नितीन गडकरी हे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग विकास मंत्रिपदावर कायम आहेत. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण तर एस जयशंकर यांच्याकडे विदेश मंत्रालयाची जबाबदारी कायम आहे. तथापि, शिवराज सिंह यांना कृषी मंत्रालय सोपवण्यात आलेले आहे. स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री असलेले प्रतापराव जाधव यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण, आयूष मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय व विकास मंत्रालय कायम ठेवण्यात आलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खातेवाटप जाहीर करण्यास यावेळेस २३.३० तासांचा वेळ लागला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये शपथविधीनंतर १८ तास, तर २०१४ मध्ये १५.३० तास लागले होते. मोदी यांनी रविवारी ७१ मंत्र्यांसह शपथ घेतली होती. त्यात ३० कॅबिनेट व ५ स्वतंत्र प्रभार राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज सायंकाळी साडेसहा वाजता या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आलेले आहे.