Breaking newsHead linesPoliticsWorld update

मोदींचे ‘जम्बो मंत्रिमंडळ’; २४ राज्यांतून ७१ मंत्री!

– ३० कॅबिनेट, ३६ राज्यमंत्री अन् ५ जणांना स्वतंत्र प्रभार मंत्री म्हणून शपथविधी
– शेजारी देशांच्या ७ राष्ट्रप्रमुखांसह देशातील मान्यवर, चित्रप अभिनेते व अभिनेत्री यांची शपथविधी सोहळ्यास उपस्थिती

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे नेते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सलग तिसर्‍यांदा शपथ घेतली. यंदा पहिल्यांदाच मोदी यांचे जम्बो मंत्रिमंडळ अस्तित्वात आले असून, मोदी यांच्यासह ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यामध्ये नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, राजनाथ सिंह, अमित शाह, जेपी नड्डा व शिवराज सिंह आदींचा समावेश होता. ३० कॅबिनेट, ३६ राज्यमंत्री व ५ स्वतंत्र प्रभार मंत्री असे जम्बो कॅबिनेट आजच्या शपथविधीनंतर अस्तित्वात आले आहे. या शपथविधी सोहळ्याला शेजारीत राष्ट्रांचे सात प्रमुख, चित्रपट अभिनेते व अभिनेत्र्या, रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आदींचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. महाराष्ट्रातून सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणार्‍या रक्षा खडसे (जळगाव) व बाजार समितीचे सभापती ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत प्रवास करणारे प्रतापराव जाधव (बुलढाणा) यांना या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु, मोदी सरकारमध्ये या दोघांनाही राज्यमंत्रीपद मिळालेले आहे. भाजपने अनेक मित्रपक्षांच्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदे दिली आहेत. मात्र महाराष्ट्रातील मित्रपक्षांवर अन्याय केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

– असा झाला मंत्र्यांचा शपथविधी –

१) नरेंद्र मोदी, पंतप्रधान
२) राजनाथ सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप)
३) अमित शहा, कॅबिनेट मंत्री (भाजप)
४) नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
५) जे.पी. नड्डा, कॅबिनेट मंत्री (भाजप)
६) शिवराज सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री (भाजप)
७) निर्मला सितारमन, कॅबिनेट मंत्री (भाजप)
८) एस.जयशंकर, कॅबिनेट मंत्री (भाजप)
९) मनोहरलाल खट्टर, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१०) एच.डी कुमारस्वामी, कॅबिनेट मंत्री (जनता दल)
११) पियुष गोयल, कॅबिनेट मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
१२) धर्मेंद्र प्रधान, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१३) जीतनराम मांझी, कॅबिनेट मंत्री (हिंदुस्थानी अवाम मोर्चा)
१४) राजीव रंजन सिंह, कॅबिनेट मंत्री (जनता दल संयुक्त)
१५) सर्बानंद सोनोवाल, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१६) वीरेंद्र कुमार, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१७) राम मोहन नायडू, कॅबिनेट मंत्री (टीडीपी)
१८) प्रल्हाद जोशी, कॅबिनेट मंत्री (भाजप)
१९) जुएल ओराम, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२०) गिरीराज सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२१) अश्विनी वैष्णव, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२२) ज्योतिरादित्य शिंदे, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२३) भूपेंद्र यादव, कॅबिनेट मंत्री (भाजप)
२४) गजेंद्रसिंह शेखावत,कॅबिनेट मंत्री
२५) अन्नपूर्णा देवी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
२६) किरण रिजुजू,कॅबिनेट मंत्री (भाजप)
२७) हरदीपसिंग पुरी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
२८) मनसुख मांडविय,कॅबिनेट मंत्री (भाजप)
२९) जी. किशन रेड्डी,कॅबिनेट मंत्री (भाजप)
३०) चिराग पासवान, कॅबिनेट मंत्री (लोक जनशक्ती पार्टी)
३१) सी.आर. पाटील, राज्य मंत्री (भाजप)
३२) राव इंद्रजित सिंह, राज्य मंत्री (भाजप)
३३) डॉ. जितेंद्र सिंह, राज्य मंत्री (भाजप)
३४) अर्जुन राम मेघवाल, राज्य मंत्री (भाजप)
३५) प्रतापराव जाधव, राज्य मंत्री (शिवसेना,महाराष्ट्र)
(प्रतापराव गणपतराव जाधवचा भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेतून शपथ)
३६) जयंत चौधरी, राज्य मंत्री (राष्ट्रीय लोकदल)
३७) जितीन प्रसाद, राज्य मंत्री (भाजप)
३८) श्रीपाद नाईक, राज्य मंत्री (भाजप)
३९) पंकज चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
४०) कृष्णपाल, राज्य मंत्री (भाजप)
४१) रामदास आठवले, राज्य मंत्री (रिपाई, महाराष्ट्र)
(आठवलेंना पुन्हा संधी, तिसऱ्यांदा मंत्रिपदाचा शपथविधी)
४२) रामनाथ ठाकूर, राज्य मंत्री (डेडीयू)
४३) नित्यानंद राय, राज्य मंत्री (भाजप)
४४) अनुप्रिया पटेल, राज्य मंत्री (अपना दल)
४५) व्ही.सोमण्णा, राज्य मंत्री (भाजप)
४६) चंद्रशेखर पेम्मासानी, राज्य मंत्री (टीडीपी)
४७) एसपी सिंह बघेल, राज्य मंत्री (भाजप)
४८) शोभा करंदलाजे, राज्य मंत्री (भाजप)
४९) किर्तीवर्धन सिंह, राज्य मंत्री (भाजप)
५०) बी.एल. वर्मा, राज्य मंत्री (भाजप)
५१) शंतनू ठाकूर, राज्य मंत्री (भाजप)
५२) सुरेश गोपी, राज्य मंत्री (भाजप)
५३) एल. मुरुगन, राज्य मंत्री (भाजप)
५४) अजय टामटा, राज्य मंत्री (भाजप)
५५) बंडी संजय, राज्य मंत्री (भाजप)
५६) कमलेश पासवान, राज्य मंत्री (भाजप)
५७) भगीरथ चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
५८) सतीशचंद्र दुबे, राज्य मंत्री (भाजप)
५९) संजय सेठ, राज्य मंत्री, (भाजप)
६०) रवनीत सिंग बिट्टू, राज्य मंत्री (भाजप)
६१) दुर्गादास उईके, राज्य मंत्री (भाजप)
६२) रक्षा खडसे, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
(रावेरमधून तिसऱ्यांदा खासदार, रक्षा खडसेंची मंत्रिपदाची शपथ)
६३) सुकांता मुजूमदार, राज्य मंत्री (भाजप)
६४) सावित्री ठाकूर, राज्य मंत्री (भाजप)
६५) तोखन साहू, राज्य मंत्री (भाजप)
६६) राजभूषण चौधरी, राज्य मंत्री (भाजप)
६७) भूपतीराजू श्रीनिवास वर्मा, राज्य मंत्री (भाजप)
६८) हर्ष मल्होत्रा, राज्य मंत्री (भाजप)
६९)निमुबेन बांभणिया, राज्य मंत्री (भाजप)
७०) मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्री (भाजप, महाराष्ट्र)
(नगरसेवक ते केंद्रीय मंत्री, मुरली अण्णांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली)
७१) जॉर्ज कुरीयन, राज्य मंत्री (भाजप)
७२) पवित्र मार्गेरिटा, राज्य मंत्री (भाजप)


एनडीएच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित होते.

भाजपाने अनेक मित्रपक्षांच्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. मात्र महाराष्ट्रातील मित्रपक्षांवर अन्याय केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाने दोन खासदार असलेल्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर या पक्षाला दोन कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. तर केवळ एक खासदार असलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं आहे. स्वतः जीतन राम मांझी यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अपना दल या पक्षाच्या प्रमुख आणि एकमेव खासदार अनुप्रिया पटेल यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र सात खासदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एकच राज्यमंत्रिपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला एक खासदार निवडून आलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकही मंत्रिपद दिलेलं नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, अजित पवार गटाचा पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात विचार केला जाईल. भाजपाने मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश केला आहे. यामध्ये नितीन गडकरी, पियूष गोएल या दोघांना कॅबिनेट मंत्रिपद तर मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!