Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णीसाठी राज्यातील सहा खासदारांना ‘पीएमओ’तून फोन!

– प्रफुल्ल पटेल, नारायण राणे, छत्रपती उदयनराजे भोसले अद्याप ‘वेटिंग’वर!
– आज सायंकाळी ७ वाजता मोदींच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ सरकारचा शपथविधी

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे नेते नरेंद्र मोदी यांचा आज सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांच्या मुहुर्तावर पंतप्रधान पदाचा राष्ट्रपती भवनात शपथविधी होत असून, त्यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार्‍या खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) फोन गेले आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. तथापि, अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल व भाजपचे नारायण राणे यांना अद्याप फोन गेलेले नाही, असे वृत्त हाती आले आहे. यामध्ये भाजपचे नितीन गडकरी (नागपूर), पियूष गोएल (मुंबई), रक्षा खडसे (जळगाव), व मुरलीधर मोहोळ (पुणे), शिंदे गटाचे प्रतापराव जाधव (बुलढाणा) व रिपाइंचे रामदास आठवले यांना फोन गेले असल्याचे भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल, नारायण राणे यांना मात्र हे वृत्त लिहिपर्यंत फोन गेलेले नव्हते. त्यामुळे या नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
NDA Govrnment forming

एनडीए सरकारचा आज सायंकाळी शपथविधी होत आहे. या सरकारमध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार? याची चर्चा रंगली असतानाच महाराष्ट्रामधून सहा जणांना मंत्रिपद जवळपास निश्चित झाले आहे. ज्या खासदारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार आहे, त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन केले जात आहेत. राज्यातील सहा खासदारांना आतापर्यंत फोन गेले आहेत. यातील चार जण भाजपचे आहेत. पियूष गोएल, नितीन गडकरी, रक्षा खडसेंना पंतप्रधान कार्यालयातून सर्वात आधी फोन आले. गोयल आणि गडकरींनी याआधीच्या मंत्रिमंडळांमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. रावेरमधून सलग तिसर्‍यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसेंना पंतप्रधान कार्यालयाकडून निमंत्रण आलेले आहे. त्यामुख खडसे या मोदींच्या मंत्रिमंडळातील नवा चेहरा असतील. रिपाइंकडून रामदास आठवले यांना तिसर्‍यांदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे.
विशेष म्हणजे, नगरसेवक, पुण्याचे महापौर ते खासदार असा प्रवास करणार्‍या मुरलीधर मोहोळ यांनादेखील पंतप्रधान कार्यालयातून बोलावणे आलेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले मोहोळ गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मोहोळ पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी पुणे मतदारसंघात काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा पराभव केला. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र, प्रफुल पटेल यांना अजूनही कोणताही फोन गेलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. मात्र, अजूनही त्यांना मंत्रिपदाबाबत फोन आलेला नाही. त्यामुळे अजित पवार गट मंत्रिपदासाठी अजूनही वेटिंगवर असल्याचे दिसून आले.


राज्यामध्ये मंत्रिपदी देत असतानाच प्रादेशिक समतोल राखला जाणार आहे. याचा विचार केल्यास विदर्भातून नितीन गडकरी व प्रतापराव जाधव हे मंत्रिपदी असतील, तर मुंबईतून पियूष गोएल हे असणार आहेत. रामदास आठवले जातीय समीकरणातून मंत्रिपदी असतील, तर उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातून मंत्रिपद दिले जाते का? याकडेसुद्धा सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे, नारायण राणे यांना मंत्रिपदासाठी अजून फोन गेलेला नाही. उदयनराजे भोसले यांच्या नावाचीसुद्धा चर्चा होती. मात्र, अजून त्यांना फोन आलेला नाही.
——————
नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाची पहिली संभाव्य यादी :
अ. क्र. नाव पक्षाचे नाव राज्य मतदारसंघ खाते
नरेंद्र मोदी भाजपा उत्तर प्रदेश वाराणसी
किंजरापू राम मोहन नायडू टीडीपी आंध्र प्रदेश श्रीकाकुलम
चंद्रशेखर पेम्मासानी टीडीपी आंध्र प्रदेश गुंटूर
प्रतापराव जाधव शिवसेना महाराष्ट्र बुलढाणा
रामनाथ ठाकूर JD(U) बिहार राज्यसभा खासदार
एच डी कुमारस्वामी जेडी (एस) कर्नाटक मंड्या
अर्जुन राम मेघवाल भाजपा राजस्थान बिकानेर
सर्बानंद सोनोवाल भाजपा आसाम दिब्रुगड
. जितन राम मांझी हि.आवाम मोर्चा बिहार गया
१० सुरेश गोपी भाजपा केरळ त्रिशूर
११ हरदीप सिंग पुरी भाजपा पंजाब
१२ रवनीत सिंग बिट्टू भाजपा पंजाब
१३ नितीन गडकरी भाजपा महाराष्ट्र नागपूर
१४ पियुष गोयल भाजपा महाराष्ट्र मुंबई उत्तर
१५ रामदास आठवले RPI(A) महाराष्ट्र
१६ रक्षा खडसे भाजपा महाराष्ट्र रावेर
१७ धर्मेंद्र प्रधान भाजपा ओडिशा संबलपूर
१८ प्रल्हाद जोशी भाजपा कर्नाटक धारवाड
१९ बंदी संजय कुमार भाजपा तेलंगणा करीमनगर
२० हर्ष मल्होत्रा ​​ भाजपा दिल्ली पूर्व दिल्ली
२१ श्रीपाद नाईक भाजपा गोवा उत्तर गोवा</td>
२२ अजय तमटा भाजपा उत्तराखंड अल्मोरा
२३ एस जयशंकर भाजपा गुजरात राज्यसभा खासदार
२४ मनसुख मांडविया भाजप गुजरात पोरबंदर
२५ अश्विनी वैष्णव भाजपा ओडिशा राज्यसभा
२६ निर्मला सीतारामन भाजपा कर्नाटक राज्यसभा
२७ जितेंद्र सिंह भाजपा जम्मू आणि काश्मीर उधमपूर
२८ शिवराज सिंह चौहान भाजपा मध्य प्रदेश विदिशा
२९ चिराग पासवान लोजपा (RV) बिहार हाजीपूर
३० राजनाथ सिंह भाजपा उत्तर प्रदेश लखनौ
३१ ज्योतिरादित्य सिंधिया भाजपा मध्य प्रदेश
३२ किरेन रिजिजू भाजपा अरुणाचल प्रदेश अरुणाचल पश्चिम
३३ गिरीराज सिंह भाजपा बिहार बेगुसराय
३४ जयंत चौधरी आरएलडी उत्तर प्रदेश राज्यसभा
३५ अन्नामलाई भाजपा तामिळनाडू
३६ एमएल खट्टर भाजपा हरियाणा करनाल
३७ जी किशन रेड्डी भाजपा तेलंगणा सिकंदराबाद
३८ चंद्रशेखर चौधरी AJSU झारखंड गिरडीह
३९ जितिन प्रसाद भाजपा उत्तर प्रदेश पिलीभीत
४० पंकज चौधरी भाजपा उत्तर प्रदेश महाराजगंज
४१ . बीएल वर्मा जेडीयू उत्तर प्रदेश
४२ लालन सिंग एडी बिहार मुंगेर
४३ अनुप्रिया पटेल भाजपा उत्तर प्रदेश झारखंड
४४ अन्नपूर्णा देवी भाजपा झारखंड कोडरमा
४५ कमलजीत सेहरावत भाजपा दिल्ली पश्चिम दिल्ली
४६ राव इंद्रजीत सिंग भाजपा हरियाणा गुरुग्राम
४७ ​​भूपेंद्र यादव भाजपा राजस्थान राज्यसभा
४८ संजय सेठ भाजपा झारखंड रांची
४९ कृष्ण पाल गुर्जर भाजपा हरियाणा
५० मुरलीधर मोहळ भाजपा महाराष्ट्र पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!