AalandiPachhim MaharashtraPune

आळंदीत श्रींचे वैभवी रूप दर्शनास भाविकांची गर्दी!

प्रस्थानदिनी ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० दिंडीकरी यांना मंदिरात प्रवेश ; निर्णय जाहीर

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री गोरोबा काका आदी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत गुढी पाडव्या पासून चंदन उटी लावण्यास सुरुवात केली जाते. या दरम्यान श्रींचे समाधीवर विविध अवतार साकारले जातात. शुक्रवार ( दि. ७ ) यावर्षीची शेवटची चंदन उटी लेप लावण्यात आला. यावेळी श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रींचे चंदन उटी लावत श्रींचे गरुड वाहन श्रीविष्णू अवतार चंदन उटी रूप साकारण्यात आले. आळंदी मंदिरात देखील श्रींचे समाधीवर चंदन उटी लावण्यात आली.
स्वामी महाराज मठात गरुड वाहन श्रीविष्णू अवतार लक्षवेधी साकारण्यात आला.

यावेळी श्रींचे गाभाऱ्यात आकर्षक आंब्यांसह आंब्यांचे पानांची पुष्प सजावट करण्यात आली होती. स्वामी महाराज मठात गरुड वाहन श्रीविष्णू अवतार लक्षवेधी साकारण्यात आला. भाविकांनी श्रींचे दर्शनासह चंदन उटी पाहण्यास गर्दी केली. स्वामी महाराज मठात श्रींचे चंदन उटी रूप साकारण्यास श्रींचे पुजारी मनीष गांधी, अमोल गांधी, विलास गांधी यांनी परिश्रम घेतले. श्रींचे वैभवी उटी साकारण्यात श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजीं नगरसेवक सुधीर गांधी, मुकुंद गांधी परिवाराचा हातखंडा आहे. अनेक वर्षां पासून स्वामी महाराज मंदिरात ते श्रींची पूजा तसेच चंदन उटी साकारत आहेत. आळंदी मंदिरास सदिच्छा भेट देत प्रांत जोगेंद्र कट्यारे, पुणे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांचा शरचे दर्शन झाल्या नंतर आळंदी देवस्थान तर्फे विश्वस्त योगी निरंजन नाथजी, विश्वस्त भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

प्रस्थान दिनी ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकरी, दिंडीकरी यांनाच प्रवेश

दरम्यान माऊली मंदिरातील भक्त निवास मध्ये दिंडी प्रमुख, फडकरी, मानकरी, चोपदार महसूल व पोलीस प्रशासन, आळंदी देवस्थानचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्याचे नियोजन बाबत संवाद बैठक झाली. यावेळी अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन होते. यावेळी प्रस्थान दिनी मंदिरात निर्धारित श्रींचे रथा पुढील २० आणि मागील २७ यासह ९ उप दिंड्यांतील एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्येकी फक्त ९० वारकरी यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे ठरविण्यात येऊन जाहीर करण्यात आले. यासाठी भक्त निवासात मान्यवर दिंडी प्रमुखांनी चर्चेत भाग घेऊन मंदिर प्रवेशाची संख्या निश्चित केली. मंदिरात प्रस्थान दिनी प्रवेशावर सर्वच घटकांना सामोरे जावे लागणार आहे. मंदिराचे क्षेत्रफळाचा विचार करून अनावश्यक गर्दी कमी करण्या बाबत सविस्तर चर्चा करीत संवाद साडब्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा आळंदी देवस्थानचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे,पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे, सहाय्यक पोलीस आयुक्त गौर, राणा महाराज वासकर, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, आळंदी शहर शिवसेना ( शिंदे गट ) राहुल चव्हाण यांचेसह दिंडीकरी, मानकरी, फडकरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी भाग घेत प्रस्थान दिनी १२५, १००. ९५ वारकरी संख्या निश्चित करण्याची मागणी करीत अखेर यावर्षी ५६ दिंडीतील प्रत्येकी ९० वारकरी यांना प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली. उपस्थितांनी या निर्णयाचे स्वागत केले. या वर्षीचे सुलभतेचा विचार करून पुढील वर्षी ही संख्या वाढविण्यास फेरविचार करून संख्या वाढवावी अशीही मागणी निर्णय जाहीर करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाने केली. मागील वर्षी मंदिरात प्रेवेशण्या दरम्यान महाद्वारात तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे बोळा समोरून महाद्वाराकडे येताना वारक-यांचे गर्दीने चेंगरा चेंगरी झाली होती. यामुळे पोलीस, वारकरी, पालखी सोहळ्यातील संबंधित घटक यांचे वादंग निर्माण झाला होता. असा अनुचित प्रकार यापुढे घडू नये यासाठी दक्षता घेण्या सह उपाय योजना सुचविणारी सुसंवाद साधणारी बैठक आळंदीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!