Head linesLONARVidharbha
पंकजाताई मुंडेंबद्दल आक्षेपार्ह ‘स्टेटस’ ठेवले; उद्या बिबी शहर व बाजारपेठ बंद!
बिबी (ऋषी दंदाले) – जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील युवक अनिकेत सरकटे याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे यांच्याबद्दल मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी मुंडे समर्थकांसह सर्वच समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे बिबी परिसरातील सर्व समाजातील युवकांनी बिबी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देत, व घोषणाबाजी करत संबंधित आरोपीचा निषेध करत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच, या घटनेचा निषेध म्हणून रविवारी (दि.९) बिबी शहर व बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचे निवेदनही बिबी पोलिसांना देण्यात आलेले आहे.
वझर सरकटे येथील संबंधित आरोपीवर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास महाराष्ट्रभर मुंडेसमर्थक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आलेला आहे. याप्रसंगी बिबीचे उपसरपंच भास्कर खुळे, देवानंद सानप, गजानन घुले, अजय कायंदे, नूतन काळुसे, संदीप आखाडे, सिध्देश्वर काकडे, धनंजय सानप, गणेश हांगे, सागर मुरतडकर, महेश धाईत, राम डुकरे, प्रवीण धाईत, शुभम दराडे, सुमित डिघोळे, विशाल मुळे, राहुल आटोळे, महादेव डुकरे, सचिन रनमळे, वैभव कापकर, भागवत आटोळे यासह शेकडो नागरिक हजर होते.