BuldanaBULDHANAHead linesLONARSINDKHEDRAJAVidharbha

चालकाला डुलकी लागली; अन् भरधाव बस चार पलट्या खाऊन उलटली!, 17 प्रवासी जखमी

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – पुण्याहून यवतमाळच्या दिशेने निघालेल्या लक्झरी बसचा सिंदखेडराजानजीकच्या सावखेड तेजन फाट्याजवळ आज (दि.७) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. जुन्या मुंबई-नागपूर मार्गावर ही दुर्घटना घडली. गावकर्‍यांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे समजते. चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व बसने तब्बल तीन ते चार पलट्या खात रस्त्याच्या कडेला उलटली. त्यामुळे या भीषण अपघातात १७ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील जवळपास १० जखमींना पुढील उपचारासाठी जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर किरकोळ जखमींवर सिंदखेडराजा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींमध्ये लहान बालकांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झालेली आहे.

सविस्तर असे, की चिंतामणी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस प्रवासी घेऊन काल रात्री पुण्याहून निघाली होती. आज शुक्रवारी सकाळी ही बस सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन फाट्याजवळ पोहोचली असता, चालकाला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर बसने ३ ते ४ पलटी खाल्ली आणि त्यामध्ये प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमींना तात्काळ उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. तर जखमींवर सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जखमीमध्ये यवतमाळ, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासीयांचा समावेश आहे. पुणे ते मानोरा (जिल्हा वाशीम)कडे जाणार्‍या (एआर ०६ ए ९७४१ क्रमाकाच्या) चिंतामणी ट्रॅव्हल्स बसला हा दुर्देवी अपघात झाला. अपघातातील जखमींचा तपशील पुढीलप्रमाणे आहे- योगेश गणेश शेंदुरकर २५ वर्ष, रा. कोठारी तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम, दिनेश मधुकर राठोड वय २४ वर्ष रा. पिंपळखुटा तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ, संदीप बाबू सिंग राठोड वय ३१ वर्षे रा. पिंपळगाव, तालुका दारवा जिल्हा यवतमाळ, प्रीतम संतोष पडघान २४ वर्ष राहणार आडोळी, तालुका जिल्हा वाशिम, अंकुश प्रल्हाद पोहाणे रा. कवठळ, तालुका मंगरूळपीर, जिल्हा वाशिम, सुनील मोहन पवार रा.वार्डा खेरडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, वैष्णवी पुरुषोत्तम अंभोरे वय १९ वर्ष, राहणार सावरखेड, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला, उज्वल पुरुषोत्तम अंभोरे वय १६ वर्ष रा. सावरखेड, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला, सौरव विजय पोले वय २१ वर्ष राहणार शिवनी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, सुरेश मानसिंग जाधव ४७ वर्ष, राहणार भोईनी, तालुका मानोरा जिल्हा वाशिम, स्वराज राम राठोड वय ३ वर्ष राहणार सावरगाव, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, सदाशिव विष्णू निकष वय ३४ वर्ष राहणार सावत्रा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा, प्रतीक्षा सदाशिव निकष २८ वर्ष, राहणार सावत्रा, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा, सरस्वती गजानन गायकवाड वय ३७ वर्ष राहणार वाशिम, मीणा भारत कांबळे, वय ५० वर्ष राहणार वाशिम, अविनाश भीमराव मोरे रा. शहापूर, तालुका जिल्हा वाशिम, दीपाली अविनाश मोरे वय २६ वर्ष राहणार शहापूर, तालुका जिल्हा वाशिम, अशी जखमींची नावे आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!