आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील निघोजे ( ता. खेड ) निघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा गणेश फडके यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी व्हि. एल. गाडीलकर यांनी सांगितले. निघोजे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दत्तात्रय आंद्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा इतर सदस्य यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी राजीनामा दिला होता. या मुळे उपसरपंच पदाची एक जागा रिक्त होती.
उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या निवडीसाठी सरपंच सुनीता येळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी मुदतीत अर्ज भरण्याचे वेळेत इंदिरा गणेश फडके यांचा एकमेव अर्ज आला होता. तो अर्ज वैध ठरला. एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने उपसरपंच पदी इंदिरा गणेश फडके यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच तथा पीठासीन अधिकारी सुनीता येळवंडे यांनी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आंद्रे, अजित येळवंडे, समाधान येळवंडे, सागर येळवंडे, दिपक कांबळे, प्रियांका आल्हाट, छाया येळवंडे, रुपाली येळवंडे, मनीषा बेंडाले, आलकाबाई येळवंडे, स्नेहा फडके, ग्रामविकास अधिकारी व्हि. एल. गाडीलकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, निघोजे ग्रामस्थ, सेवक कर्मचारी वृन्द यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उपसरपंच इंदिरा फडके यांचा सत्कार करण्यात आला, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.