आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर गुढी पाडव्या निमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत संस्थान तर्फे चंदन उटीतून श्री विघ्नहर ( श्रीक्षेत्र ओझर ) श्री’चे गणेशावतारातील वैभवी रूप अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी परिश्रम पूर्वक साकारले. श्रीचे वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती.
माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापासून श्रीचे संजीवन समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास प्रारंभ होत असतो .चैत्र महिन्यातील पहिली चंदन उटी गुढी पाडव्यास श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रीचे वैभवी गणेशावतार रूप चंदन उटी तून साकारले. यासाठी संस्थांचे वतीने चंदन उटीचे सेवाकार्य अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी केले. श्रीक्षेत्रोपाध्ये माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी आणि नितीन गांधी परिवाराने श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात परिश्रम पूर्वक गणेश अवतार श्रींचे संजीवन समाधीवर साकारण्यात आले. गुढी पाडव्या निमित्त माऊली मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. या लक्षवेधी सजावटीचे तसेच श्रींचे रंगावलीतील रूप दर्शन भाविकांनी केले.
आळंदी मंदिरात गुढी पाडव्यानिमित्त श्रीना पवमान अभिषेक पूजा प्रमुख विश्वस्त अँड राजेंद्र उमाप यांचे हस्ते झाली. यावेळी विश्वस्त योगी निरंजननाथजी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,चोपदार बाळासाहेब रणदिवे, तुकाराम माने. सेवक, पुजारी उपस्थित होते. परंपरेने श्रीचे चोपदार यांनी गुढी पुजन केले. वारकरी शिक्षण संस्थे तर्फे कीर्तन सेवा रुजू करण्यात आली. दरम्यान मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा, भाविकांच्या महापूजा, महिमन्पुजा ,श्रीना दुधारती, धुपारती आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. चंदन उटी प्रसंगी विश्वस्त योगी निरंजननाथ जी उपस्थित होते.
आळंदी मंदिरात भाविक, नागरिक, साधक यांनी श्रीचे दर्शनास गर्दी केली. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांनच्या प्रथा प्रमाणे मंदिरात पाडव्याचे धार्मिक महत्व ओळखून विश्वस्त मंडळाचे नियंत्रणात नियोजन केले. शहरात ठीकठीकांनी रंगावलीसह घराघरांवर गुढी उभारण्यात आली. अनेक ठिकाणी नवीन उपक्रमांचे आयोजन झाले. नव्या दुचाकी तसेच चारचाकी गाड्यांची मंदिरालगत पूजा उत्साहात युवक तरुणांनी केली. हिंदू नव वर्षांचे स्वागत अनेक युवक-तरुणांनी नवे संकल्प करीत केले.
आळंदीत रामजन्मोत्सवास प्रारंभ
येथील आवेकर-भावे श्री रामचंद्र संस्थानच्या श्री राम मंदिरात रामजन्मोत्सवास प्रथा परंपरांचे पालन करीत राम नवमी वार्षिक उत्सवास सुरुवात झाली. या निमित्त गुढी पाडवा ते राम नवमी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात नारदीय कीर्तन सेवा परंपरेने होत आहे. भजन, गीत रामायण,भजन संध्या, कथा-कथन, श्रीचे जन्मोत्सवाचे कीर्तन आदी धार्मिक उपक्रम राबविले जात आहेत. राम नवमी निमित्त श्री राम पालखी नगर प्रदक्षीण होत आहे. संस्थानचे पंच मंडळाचे वतीने भाविकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन प्रमुख विश्वस्त संजय आवेकर यांनी केले आहे. आळंदीसह परिसरात घरोघरी गुढी उभी करीत नागरिकांनी परंपरेने गुढी पाडवा सण धार्मिक पावित्र्य जोपासत उत्साहात साजरा करण्यात आला.