Breaking newsHead linesPolitical NewsPolitics

वंचित आघाडीची दुसरी यादी जाहीर; सोलापुरातून राहुल गायकवाड मैदानात

नागपूर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सोलापूर, माढा, सातारा, मुंबई उत्तर मध्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीने आता एकला चलो रेचा मार्ग निवडला असून, पहिली यादी जाहीर केल्यानंतर रविवारी रात्री पुन्हा दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर यांना, तर सोलापुरातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासोबतच माढ्यातून रमेश बारसकर, सातारा मारुती जानकर, धुळ्यातून अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

आज जाहीर झालेले उमेदवार

हिंगोली : डॉ. बी. डी. चव्हाण
लातूर : नरसिंहराव उदगीरकर
सोलापूर : राहुल काशिनाथ गायकवाड
माढा : रमेश नागनाथ बारसकर
सातारा : मारुती धोंडिराम जानकर
धुळे : अब्दुल रहमान
हातगणंगले : दादासाहेब पाटील
रावेर : संजय ब्राम्हणे
जालना : प्रभाकर बकळे
उत्तर-मध्य मुंबई : अबुल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : काका जोशी

पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही समाजातील सर्व जाती-जमातींना स्थान देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर या यादीतही लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वीच पहिली यादी जाहीर केली होती. यात 8 लोकसभा उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आता दुसऱ्या यादीत त्यांनी 11 जागांवरील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे आतापर्यंत वंचितने 19 लोकसभा उमेदवार जाहीर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!