सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – लोकांची व शासनाची कामे वेळेत पूर्ण करा, शासकीय कामकाज करताना काहीही अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी आहे, अशी निसंदिग्ध ग्वाही सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी ग्रामसेवकांना दिली. प्रा. खडसे हे लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासनात ओळखले जातात. अकोल्यानंतर आता त्यांना बुलढाणा जिल्ह्यात तेवढीच लोकप्रियता मिळत असल्याचे दिसून येत आहेत.
सिंदखेडराजा येथे नुकतेच उपविभागीय अधिकारी म्हणून प्रा. संजय खडसे रुजू झालेले आहेत. त्यामुळे सिंदखेडराजा ग्रामसेवक संघटनेतर्पेâ त्यांचा काल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी शासनाचे कामकाज वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले, तसेच ग्रामसेवकांना शासकीय कामकाज करताना काहीही अडचण आल्यास मी सदैव आपल्या पाठीशी आहे, असेसुद्धा सांगितले. याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल, आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते, कैलास झिने, गणेश मेहत्रे, अरविंद राठोड, कारभारी शिंगणे, रामदास मेहेत्रे, रवींद्र काळुसे यांच्यासह अनेक ग्रामसेवक उपस्थित होते, अशी माहिती संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख तथा तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक म्हणून ओळखले जाणारे विनोद सातपुते यांनी दिली आहे.
याच मातीत तुझी आमदारकी, खासदारकी गाडणार!