नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र):- जिल्ह्यात जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती गेल्या आठवड्याभरा पासून झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्यांना वेग आला असून जिल्ह्यात यावर्षी ३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी २ लाख ९ हजार ७२४ क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून एकूण निर्धारित क्षेत्राच्या पेरणीच्या लक्षांक पूर्ण होणार आहे. यावर्षी सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे. निर्धारित क्षेत्रात यावर्षी संपूर्ण पेरणी पूर्ण होणार आहे. आठवडाभरात झालेल्या पावसामुळे नवापूर, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात भात लागवडीला वेग आला आहे. यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केली गेली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७१ टक्के पेरणी पूर्ण ……
२ लाख ०९ हजार ७२४ क्षेत्रावर पेरणी झाली आह……
सोयाबीन पेरणीच्या टक्केवारी :- ८७%
भात पेरणीची टक्केवारी :- ५५%
कापूस पेरणीच्या टक्केवारी :- ८६.०६
मका पेरणीच्या टक्केवारी :- ६६.७४
ज्वारी पेरणीच्या टक्केवारी :- ५६.४८