LATUR

गाेगलगायीने साेयाबीन खाल्ले; माजी राज्यमंत्री आ. बनसोडे शेती-बांधावर!

लातूर (गणेश मुंडे) – उदगीर तालुक्यात पुरेशा पावसावर खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा झाला आहे.  बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीबरोबर बीबीएफ तसेच टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली.  परंतु, संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.  त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे हे शेतीबांधावर पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विभागास सूचना केल्या. 

तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे, बीडीओ महेश सुळे,  मंडळ कृषी अधिकारी एस. आर. पाटील,  कृषी पर्यवेक्षक डावळे, कृषी सहायक अमोल पाटील,  ससाणे,  उपसरपंच नामदेव मुळे, पोलीस पाटील एकनाथ कसबे,  प्रकाश हैबतपुरे,  अरविंद दाबके,  शामराव मुदबे,  दिलीप पाटील, शेषेराव होळगे,  सुरेश यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,  तहसीलदार रामेश्वर निडवंचे,  बबन धनबा,  वसंतराव पाटील,  धनराज पाटील,  सोमकांत होळकर,  रमेश मोमले,  दिलीप निडवंचे,  अरविंद दाबके,  गणपत कांबळे,  विजयकुमार कांबळे,  गणेश कारभारी,  विष्णू बिरादार, मोहनराव पाटील,  अविनाश सूर्यवंशी,  सतीश गायकवाड,  शुभम भुमणे आदी शेतकरी उपस्थित होते.

भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न

माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी करडखेल येथील शेतकरी अरविंद दापके, लोहारा येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांच्या सोयाबीनच्या शेतीची पाहणी केली. गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशा सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. तसेच आपण नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!