बुलढाणा/भालगाव (संजय निकाळजे) – ज्याप्रमाणे मानवाला जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. त्याचप्रमाणे मानवाला बुद्धाच्या धम्माची गरज आहे, असे प्रतिपादन भदन्त बोधीपालो महाथेरो यांनी केले. चिखली तालुक्यातील लोकुत्तरा महाविहार भालगाव येथे रविवार (दि.4) रोजी भदन्त बोधिपालो महाथेरो यांच्या उपस्थितीत तथागत भगवान बुद्ध रूपाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते धम्मदेशना देताना बोलत होते. यावेळी भिख्खू संघ तसेच भदन्त दिव्यनाग महाथेरो, भदन्त मनायु, भदन्त खामसिंग, भदन्त धम्मानंद, भदन्त विनयशील, भदन्त संघपाल, भदन्त शिलानंद, भदन्त कुलदीप, भदन्त धम्मराज, भदन्त दीपकर, भदन्त अश्वजीत, भदन्त अश्वदीप, भदन्त अश्वाघोष, भदन्त अहिंसक, भदन्त रत्नदीप, भिख्खुनी शासनप्रीती आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित समुदायासमोर धम्मदेशना देताना भन्तेजींनी सांगितले की, जीवन हे क्षणभंगुर आहे. आणि या क्षणिक जीवनामध्ये कुशल कर्म करून दानधर्म करून पुण्य अर्जित केले पाहिजे. आपल्या आचरणामध्ये पंचशील पाळणे आणि त्याचा नेहमीसाठी अंतर्भाव केला पाहिजे, जेणेकरून आपण धम्माच्या मार्गावरून ढळणार नाही आणि आपण दानधर्म करून शिलाचे आचरण करून, समाधीचा अभ्यास आणि चित्ताला परिशुद्ध करून निर्वाण मार्गी होऊ शकतो. समाधीचा अभ्यास करणे, चित्ताला परिशुध्द करणे आणि आपले मैत्रीपूर्ण आचरण ठेवणे हे धम्माचे मूळ आहे. ह्या कार्यक्रमांमध्ये पूर्ण महाराष्ट्र मधून उपासक आणि उपासिका सकाळी आठ वाजेपासून तन-मन धनाने सम्मिलित होऊन, संपूर्ण परिसर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज घेऊन बुद्ध धम्म संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत भालगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून लोकुत्तरा महाविहार भालगाव पर्यंत लहान थोर मंडळी रॅलीने सहभागी झाले होते. उपासक उपाशीका बुद्ध धम्म संघाचा जयघोष करीत होती, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध गावातील तसेच चिखली शहरातील उपासक उपासिकांनी परिश्रम घेतले.
या वेळी तथागत भगवान बुद्ध यांच्या सुरेख रूपाचे निर्माते भदन्त खमसिंग थायलंड यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यांनी अतिशय सुरेख अशी बुद्ध रूपाची निर्मिती येथे करून देण्यात आली आणि त्यांनी स्वतः परिश्रम करून विविध ठिकाणी आत्तापर्यंत ५८ बुद्ध रूपांची निर्मिती संपूर्ण महाराष्ट्रभर केली आहे. त्यांचा मानस १०८ बुद्ध रूप निर्माण करून देण्याचे आहे. याबद्दल त्यांना साधूवाद देण्यात आला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पूजनीय भिक्खु संघ उपस्थित होता. पूजनीय भदन्त कश्यप महाथेरो यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. हा कार्यक्रम भदन्त बोधीपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे भदन्त बी .राहुलो यांनी नियोजित करून पार पाडला. या वेळी लोकुत्तरा महाविहाराचे पूर्ण भिक्खू संघ यामध्ये भदन्त मनायु, भदन्त कुलदीप, भदन्त विनयशील, भदन्त शीलानंद, भदन्त धम्मानंद, भदन्त धम्मरतन, भन्ते अश्वघोष, भन्ते विद्यानंद, भन्ते ईध्दीपय्यो. आणि उपासक उपसिका उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आजी, माजी सैनिक समता सैनिक दल, समाधान चव्हाण, जानकीराम घोरपडे, सुशील राऊत, गणेश बोर्डे, अर्जुन बोर्डे, एकनाथ बोर्डे , भारत साबळे, विठ्ठल पवार ,रामदास चव्हाण, पप्पू जाधव, रवी चव्हाण, कडूबा जाधव, वैशाली वानखेडे, संगीता निकाळजे, उपचाला दाभाडे, संगीता मस्के, अनुराधा सरदार, मंगला चव्हाण, शिवगंगा चव्हाण, संजीवनी पडघान यांनी श्रमदान केले. या कार्यक्रमाला चिखली, भालगाव व परिसरातील उपासक-उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.