Pachhim MaharashtraWomen's World

‘अमृत’च्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा – अस्मिता बाजी

सातारा – जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन अमृतच्या संचालिका तथा विभागीय पालक अधिकारी सौ. अस्मिता बाजी यांनी लाभार्थी संवाद मेळाव्यादरम्यान सातारा येथील सुपनेकार हॉलमध्ये बोलताना केले.

सौ. अस्मिता बाजी म्हणाल्या, महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही आयोग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही. अशा अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. अमृतच्या विविध योजनांचा प्रसार, प्रचार करणे व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा येथे घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘अमृत’ हा अतिशय महत्वाकाक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, अर्थिक विकासाकरीता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, याच बरोबर कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधने इत्यादी योजना ‘अमृत’मार्फत रबिवल्या जात आहेत, असे त्यांनी सांगून सविस्तर मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हा समन्वयक अधिकारी महेश कोरडे, सातारा तालुका समन्वयक प्रमोद पंचपोर, कोरेगाव तालुका समन्वयक जीवन जाधव, वाई तालुका समन्वयक प्रशांत सुतार, फलटण, बारामती, माळशिरस समन्वयक आनंद इनामदार तसेच जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थी उपस्थित होते. याच बरोबर उद्योग विप्रच्या संस्थापिका सायली मुतालिक, बॉडचे सातारा संचालक विराज कुलकर्णी, विधितज्ञ सन्मान आयाचित, युवा उद्योजक रोहित साने इत्यादी मान्यवरांनी आवर्जुन या मेळाव्याला उपस्थिती दर्शवित ‘अमृत’च्या योजनांच्या प्रसारासाठी आपले योगदान देण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!