BuldanaVidharbha

देऊळगाव साकरशासह बुलढाणा, अकोला जिल्ह्यात जोरदार स्वागत

– बुद्धांचे विचार आचरणात आणा – भन्ते अजाह्य जयासारो

बुलढाणा (बाळू वानखेडे) – तथागत भगवान गौतम बुध्द यांनी जगाला शांती व प्रेमाचा संदेश दिला. बुध्द धम्मात पायरीने विकसित होण्याची शिकवण दिली आहे. हा धर्म आपण व्यवहारिक जीवनात देखील अवलंबवू शकतो. मनुष्यजन्म कठीण असून सुखमय जीवन जगण्यासाठी बुध्दाचा विचार आचरणात आणा, असे आवाहन थायलंड येथील जागतिक बौध्द धर्मगुरू अजाह्य जयासारो यांनी केले. भन्ते जयासारो यांच्यासह भिक्कू संघाच्या छत्रपती संभाजीनगर ते अकोला धम्म पदयात्रेचे (धुतंगा) नुकतेच मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे आगमन झाले असता उपासक, उपासिकांसह गावकर्‍यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर येथील सिध्दार्थ बुध्द विहारात धम्मदेसना देताना भन्ते अजाह्य जयासारो बोलत होते. आम्हाला बुध्द धम्माचा अभ्यास करण्यासाठी दहा हजार किलोमीटर वरून भारतात यावे लागते. आपला जन्मच बुध्दभूमितील असल्याने आपण किती भाग्यशाली आहात, असेही ते यावेळी म्हणाले.

जागतिक बौद्ध धर्मगुरू भन्ते अजाह्य जयासारो यांच्यासह भिक्कू संघाची २६ ड़िसेंबरपासून निघालेल्या छत्रपती संभाजीनगर ते अकोला धम्म पदयाञेचे जाप्रâाबाद, अमोना, बोरगांव काकड़े, अमड़ापूर, किन्ही नाईक, वड़ाळी, मांड़वा फॉरेस्ट मार्गे ४ रोजी जानेवारी देऊळगाव साकरशा येथे आगमन झाले असता, उपासक, उपासिकांसह गावकर्‍यांनी गावभर फुले उधळत जोरदार स्वागत केले. भदन्त अजाह्य जयासारो हे जागतिक किर्तीचे बौद्ध धर्मगुरू असून, विशेषतः कोरोना काळात त्यांनी भारतासह अनेक देशांना अ‍ॅम्बुलंस , व्हेंटीलेटर्ससह इतरही साहित्य दान दिले होते. देऊळगाव साकरशानंतर सदर धम्म पदयात्रा राहेर, पिंपळखुटा, शहापूर, चिंचोली गणू, वाड़ेगाव, देगाव मार्गे अकोल्याकड़े मार्गस्थ झाली. पदयाञेचे सर्वच ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. या पदयाञेसाठी राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे व थायलंड येथील महाउपासिका रोजाना व्हॅनिच कांबळे दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. यशस्वीतेसाठी औरंगाबाद टीमसह प्रदीप अड़ांगळे मुंबई, अकोला टीमचे रवी घनबहादूर, नितीन इंगळे, रणजीत सरदार सह स्वयंसेवक व संबंधित गावांचे उपासक, उपासिका परिश्रम घेत आहेत.


ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय प्रतिष्ठान अकोलाच्यावतीने स्थानिक खड़की येथील बुध्द धम्म संस्कार सभागृहात ७ जानेवारीरोजी सायंकाळी सात वाजता भन्ते अजाह्य जयासारो यांचे धम्म प्रवचन आयोजित केले गेले आहे. यावेळी जेष्ठ सनदी अधिकारी ड़ॉ.हर्षदीप कांबळे व रोजाना व्हॅनिच कांबळे दाम्पत्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!