NAGARPachhim Maharashtra

कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे शिर्डी येथे रविवारी एक दिवशीय चर्चासत्र

नगर (प्रा. सुभाष चिंधे) – महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या विश्व हिंदी दिवसनिमित्त राज्यस्तरीय एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 2024 दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष डॉ.मिलिंद कांबळे, तर श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गंगाधर वरघुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती संघाचे राज्याचे सचिव प्रा.रेवणनाथ कर्डीले यांनी दिली आहे.

फ़ोटो के बारे में कोई जानकारी नहीं दी गई है.शिर्डी येथील श्री साईबाबा कन्या विद्यालयात संगीत हॉल येथे रविवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे. यावेळी 2024 दिनदर्शिकेचे प्रकाशन खासदार डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते होणार आहे. या एक दिवशीय चर्चासत्र कार्यक्रमासाठी प्रा.क्षमा करजगांवकर (सहसचिव), डॉ.राजकुमार कांबळे (उपाध्यक्ष), प्रा.सौ.नंदा गायकवाड (उपाध्यक्ष), प्रा.इलाही मुलाणी (उपाध्यक्ष), प्रा.सुन्दर लोंढे (कार्याध्यक्ष), प्रा.तानाजी पाटील (सदस्य), प्रा.सौ.बीना सावंत (सदस्य), प्रा.संजय अरण्ये (सदस्य), प्रा.रामदास मुंगसे (सदस्य), प्रा.सुवर्णा मोरे (सदस्य), डॉ.नेहा बोरसे (पुणे), प्रा.लक्ष्मण नाईक (लातुर), प्रा.राजेंद्र देवकाते (कोकण), प्रा.आनंद काशीकर (कोषाध्यक्ष), प्रा.संजय पवार (सलाहकार), प्रा.जावेद शेख (समन्वयक), प्रा.डॉ.गोपाल बाहेती (संघटक), प्रा.डॉ.वंदना पावसकर (संघटक), प्रा.मधुकर घुगे (सलाहकार), प्रा.विनोद डोमकावले (सदस्य), प्रा.संजय पाटील (सदस्य), प्रा.संजय गांवकर (सदस्य), प्रा.शेख हसन कामनवाले (सदस्य), प्रा.तसनीम वोरा (अमरावती), प्रा.अनिल आठवले (मुंबई), प्रा.मिनल्ला पिरजादे (कोल्हापुर) यांच्या सह नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, अहमदनगर यासह राज्यातील हिंदी अध्यापक संघातील राज्यातील पदाधिकारी, सदस्य, विभाग, जिल्हा पदाधिकारी सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमा संदर्भात अधिक माहितीसाठी प्रा.सुनिल कांडेकर मो.-9422714991, प्रा. सतीश म्हसे मो.-9922175508, प्रा.सुभाष चिंधे मो. 8855015005 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!