MaharashtraPolitical NewsPolitics

आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतल्या पूरग्रस्तांच्या भेटी

गडचिराेली (जिल्हा प्रतिनिधी) – अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या आलापल्ली,  नागेपल्ली ग्रामपंचायत मागील अनेक दिवसापासून सतत सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसाने व पूर्णपणे शहराला लागून असलेला छोट्या-मोठ्या नाल्याचे पाणी परिसरात अनेक घरांमध्ये शिरल्याने अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या अनुषंगाने अहेरी विधानसभा सभा क्षेत्राचे आमदार  धर्मराव बाबा आत्राम यांनी आज थेट मुंबईवरून नागपूर ते गडचिरोली वाया मूलचेरा येथील येल्ला पूरग्रस्तांना भेट देऊन शेतकरी बांधवांना शासनाकडून सर्व प्रकारचे मदत करून देऊ, असे आश्वासन देण्यात आले.

लगेच आल्लापल्ली येथील वि. दा सावरकर चौक स्थित गोलकर मोला , बजरंग चौक , टेकडी कॉलनी,  एचपी पेट्रोल पंप मागील नागरिकांच्या घरोघरी जाऊन परिसराच्या आढावा घेण्यात आले. त्या दरम्यान ग्रा प सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अकनपलीवार,  सोमेश्वर रामटेके,  स्वप्नील श्रीरामवार, मनोज बोलुवार, पुष्पा अलोणे, अनसुर्या सपीडवार उपस्थित होते . त्यानंतर नागेपली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व परिसरातील नागरिकायांच्या घरी जाऊन भेट देण्यात आले . त्याचप्रमाणे नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील येनकापल्ली येथे जाऊन पूर पीडित असलेला शेतकरी बांधवांसोबत चर्चा करण्यात आले.  तसेच मोदूमडगु परिसरातील मध्ये जाऊन पूर पीडीत असलेल्या नागरिकांन सोबत चर्चा करून शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

त्या दरम्यान तहसील कार्यालयात अंतर्गत अधिकारी वर्ग उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनजी आत्राम , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे , विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, रा का अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, वासुदेव पेद्दीवार, सत्यनारायण मेरगा, नागेपल्लीचे ग्रामपंचायत सदस्य रेड्डी सावकार,  लक्ष्मीबाई सीडाम, ज्योती ठाकरे,  स्मिता निमसरकर तसेच कार्यकर्ता विनोद कोटरंगे, प्रकाश चुनारकर,  कांचनलाल वासनिक,  गणपती चौधरी पोलीस पाटील नागेपली तसेच ग्रामविकास अधिकारी नागेपली लोमेश वालके,  आर आय संतोष श्रीरामे , तलाठी एकनाथ ठेपाले आधी कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!