BuldanaBULDHANA

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव जा. येथे आज राज्यस्तरीय अधिवेशन

– पत्रकारांनी सहभागी होण्याचे जिल्हा पदाधिकाऱ्यांचे आवाहन

बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन बुधवार, दि. ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या देवाशिष लॉन्स येथे सदर अधिवेशन भरणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत उद्घाटन समारंभ होणार आहे. माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय संवाद व माहिती तंत्रज्ञ समिती भारत सरकारचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव हे राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. आकाश फुंडकर, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा दैनिक लोकमत मुंबईचे सहयोगी संपादक यदु जोशी, विशेष उपस्थिती म्हणून आय एन एस समितीचे कार्यकारी सदस्य तथा दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य तथा दैनिक वृत्त केसरी अमरावतीचे संपादक जयराम आहुजा आदींची उपस्थिती राहणार आहे. तर दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी २.३० वाजता ते ४ वाजेपर्यंत प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्वाती संदीप वाकेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती जळगावचे सभापती प्रसन्नजित पाटील, राजर्षी शाहू परिवार तथा संकल्प वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके, दैनिक महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक, अमरावती विभागीय अधीक्षक कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे, नागपूर विभागीय अधिकारी समितीचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी, अमरावती विभागीय अधिस्वीकृती समिती सदस्य राजेंद्र काळे, बुलढाणा, सुरेंद्र कुमार आकोडे, गोपाल हरणे यांची उपस्थित राहणार आहे. समारोपण सत्र हे दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत राहणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष हसूफ खान यांची उपस्थिती राहणार आहे.
यादरम्यान अधिस्वीकृती बाबत मार्गदर्शन व आजची पत्रकारिता या विषयावर राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या अधिवेशनाला पत्रकार बंधूंनी उपस्थित राहून, सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, महिला मंच प्रदेशाध्यक्ष जयश्री पंडागळे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावल, केंद्रीय सदस्य माणिक ठाकरे, प्रदीप जोशी, केंद्रीय विधी सल्लागार किरण भुते, केंद्रीय संपर्कप्रमुख प्रा रवींद्र मेंढे, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, संजय कदम, मीना राहीज, जोशीला पगारिया, वर्षा घाडगे, कांचन मुर्के, भावना सरनाईक, अनुप गवळी यांच्यासह अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, जिल्हा उपाध्यक्ष बाळू वानखेडे, जिल्हा सचिव संजय निकाळजे यांचेसह तालुका व जिल्हा पदाधिकारी कार्यकारणीच्यावतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!