ChikhaliHead linesVidharbha

काँग्रेसच्या स्थापनादिनीच चिखलीत काँग्रेसला भगदाड!

– आ. श्वेताताई महाले पाटील यांचे नेतृत्व स्वीकारले; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश!

चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात आज (दि.२८) काँग्रेस पक्ष स्थापनेच्या दिवशीच चिखली तालुका काँग्रेसला मोठे भगदाड पडले. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते चिखली पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव अंभोरे, चिखली पंचायत समितीचे माजी सदस्य राजू पाटील यांच्यासह तालुक्यातील आजी माजी सरपंच व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व नेत्यांचे पक्षात स्वागत केले. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आजच्या या पक्षप्रवेशानंतर चिखली मतदारसंघात ग्रामीण भागामध्ये भाजपमध्ये होणार्‍या इनकमिंगला येणार्‍या काळात आणखी गती मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा.सुनील मेढे (भंडारा) व आ. श्वेताताई महाले या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आ. महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लक्ष्मणराव अंभोरे मात्री सभापती पंचायत समिती, चिखली, राजू पाटील माजी सदस्य पंचायत समिती चिखली, सरपंच भोगावती, संचालक कृ. उ. बाजार समिती, गजानन अंगोरे, सरपंच, एकलारा, बाबुराव देशमुख, सरपंच सातगाव भुसारी, संतोष पाटील (दांदडे) उदयनगर, प्रकाश लोखंडे, माजी सरपंच पळसखेड लोखंडे, विलास तायडे, ग्रा.प. सदस्य सोनेवाडी, ज्ञानेशव अंभोरे, उपसरपंच एकलारा, नारायण झगरे, ग्रा.प.सदस्य एकलारा, विजय लंके, सदस्य ग्रा. प. एकलारा, प्रकाश डिगांबर अंभोरे, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती एकलारा, रामदास अंभोरे, माजी ग्रा. पं. सदस्य एकलारा, प्रसाद गजानन अंभोरे, अनिल झगरे, पत्रकार, नारायण अंभोरे, सागर विजय लोखंडे, युवा नेते भोगावती, पाटीलबा पवार, माजी सरपंच एकलारा, योगेश गजानन भुसारी, युवा कार्यकर्ते भोगावती, सदाशिव डुकरे, भोगावती यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी अंकुश तायडे, माजी सभापती पंचायत समिती चिखली, भारत सुरुशे, खरेदी विक्री संचालक तथा उदयनगर ग्रामसेवा सोसायटी, नितीन पाटील, सावरगाव डुकरे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. श्वेताताई महाले यांचे कार्य लक्षवेधी – प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

चिखली मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू करणार्‍या व भाजपाला अधिकाधिक बळकटी देण्यासाठी परिश्रम घेणार्‍या आ. श्वेताताई महाले यांचे कार्य लक्षवेधी असल्याचे गौरवद्गार प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी काढले. आ. महाले यांच्या कार्याचा झपाटा पाहून त्यांची ही आमदारकीची पहिली टर्म आहे यावर विश्वास बसत नाही, असे ते म्हणाले. भाजपाचा पाया चिखली मतदारसंघात अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाकडून त्यांना सर्वतोपरी सहकार्य व प्रोत्साहन मिळत असून स्थानिक पक्ष पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी देखील आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात चिखली मतदारसंघात येणार्‍या काळात पक्षाला सर्वच निवडणुकांमध्ये यश कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन


एकलार्‍यातून झाला काँग्रेसचा सफाया!

एकलारा या गावात भारतीय जनसंघाच्या काळापासून पक्षाची पाळीमुळे रुजली आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत संघचालक डॉ. अण्णासाहेब पानगोळे यांचे हे मूळ गाव आहे, त्यामुळे येथे भाजपाचा कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. अशा ठिकाणी आता काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी व ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे येथून काँग्रेसचा सफाया झाला असून येणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात येथून भाजपाला घसघशीत मताधिक्य मिळेल असा विश्वास प्रवेश करणार्‍या पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी बोलून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!