ChikhaliVidharbha

अंढेरा पोलिस ठाणे येथे श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – अंढेरा पोलिस ठाणे येथे श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भाविक-भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. विशेष बाब अशी, की पोलिस ठाणे परिसरात श्री दत्तात्रेयांचे मंदीर असून, ठाणेदार विकास पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

देवळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथील पोलिस ठाण्यात ठाणेदार विकास पाटील व त्यांच्या सहकारी यांच्यावतीने पोलीस स्टेशन येथे दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. त्यामध्ये अंढेरा सर्कलचे सरपंच व पोलीस पाटील व पत्रकार मित्रमंडळ यांनीसुद्धा महाप्रसादाचा लाभ घेतला. अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये कित्येक दिवसांपासून दत्ताचे मंदिर आहे. त्या मंदिराचा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील व सहकारी यांनी जीर्णोद्धार करून रंगरंगोटी केली व व्यवस्थित असे मंदिराचे काम केलेले आहे. दत्त जयंतीनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांनी श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे ठाणेदार व त्यांचे कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले आहेत. अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये कायद्याचे पालन करत असतानाच सामाजिक व धार्मिक एकात्मतेलादेखील जोपासले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!