Head linesLONARVidharbha

वडगांव तेजन परिसरासह तालुक्यात ८० टक्के शेतकर्‍यांची दुबार पेरणी!

– दुबार पेरणीचा खर्च द्यावा, अतिवृष्टी दुष्काळ भरपाई देण्याची मागणी ऐरणीवर!

लोणार (विनोद पाटील तेजनकर) – गेल्या दहा ते बारा दिवसापासून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हरभरा, तूर, ज्वारी, या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अल्प पावसामुळे जेमतेम पाण्यावर अनेक शेतकर्‍यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती. मागील काही दिवसांमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम झाला असून, अतिपावसामुळे हरभरा करपून गेल्यामुळे शेतकर्‍यांची मोठी नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या अनेक शेतकर्‍यांनी हरभरा पिकामध्ये जनावरे बकर्‍या घातलेल्या आहे. तसेच लोणार तालुक्यासह वडगांव तेजन परिसरातील ८० टक्के शेतकर्‍यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टर घातले. त्यात हे सरकार शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आता जमीन पेरावी की नाही, असा प्रश्न पडला असून, शेतकरी चिंतेत पडला आहे.

जिल्ह्यात २८ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने मोठा कहर केला होता. यामध्ये गारपीट व वादळाने पिके आडवी झाली, तर पाणी साचल्याने गहू, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला होता. दरम्यान, हा पाऊस थांबून आठवडा उलटला आहे. मात्र, तरीही शेतीपिकाचे नुकसान थांबायला तयार नाही. या पावसाच्या परिणामामुळे हरभर्‍याला बुरशीने गाठले आहे. त्यामुळे उभ्या हरभरा पिकावर शेतकरी नांगर फिरवत आहेत. दरम्यान, आता बुरशीमुळे उभ्या असलेल्या हरभरा पिकाचे मोठे नुकसान होत असल्याची बाब पुढे आल्याने यामध्ये पुन्हा वाढ होईल, असा अंदाज आहे. दुबार पेरणीचा खर्च द्यावा, राज्य शासनाकडून अतिवृष्टी दुष्काळ भरपाईसह दुबार पेरणीचा बियाण्याचा खर्च मिळावा, अशी मागणी हरभरा उत्पादक शेतकरी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!