Breaking newsHead linesMaharashtraVidharbha

चिखली-देऊळगावराजा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा!

– केवळ अंढेरा पोलिस ठाणे हद्दीत १७ अपघात, ९ जणांचे बळी, १३ जण जखमी

प्रताप मोरे
मेरा बु. (ता.चिखली – मलकापूर ते औरंगाबाद हा बुलडाणा, चिखली, देऊळगावराजामार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग ७५३ ए हा २०५ किलोमीटरपैकी चिखली ते देऊळगावराजा या मार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरु असून, हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याच्या निर्मितीत प्रचंड चुका झाल्याने हा चुका वाहनधारक व प्रवाशांच्या जीवावर बेतल्या आहेत. केवळ मुरादपूर ते सरंबा या २५ किलोमीटरच्या मार्गावर गेल्या काही महिन्याच्या काळात तब्बल १७ अपघात घडले असून, त्यामध्ये ९ जणांचे बळी गेले तर १३ जण कायमचे जायबंदी झाले आहेत. दररोज होणार्‍या किरकोळ अपघातांची तर नोंदच नाही. तर चिखली ते देऊळगावराजा या ५६ किलोमीटरच्या मार्गावर तब्बल ३३ अपघात झाले असून, त्यात बळी जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. तर शेकडो जायबंदी झाले आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने सविस्तर अहवालच सादर केला जाणार असून, राष्ट्रीय महामार्ग अधिकार्‍यांच्या गलथान व गैरकारभाराचा भंडाफोड केला जाणार असल्याचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनी सांगितले आहे.
शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत सरकारने लहान मोठे जोडरस्ते दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून ठेकेदारांच्या माध्यमातून चौपदरी सिमेंट रस्ते तयार करण्याचा सपाटा चालविला आहे. त्यामध्ये काही ठेकेदार अधिकारी वर्गांचा संगनमताने निकृष्टदर्जाचे कामे करणे, वळण रस्ते , डोगरराळ रस्ते, या ठिकाणी फलक न लावणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडे झुडपे न तोडणे, आदी कामे निकृष्ट दर्जाचे केल्याने ठिकठिकाणी सिमेंट रस्त्याला तडे जावून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामे सरकारी इस्टमेंटनुसार न करता कोट्यवधी रुपये ठेकेदाराने कमावले आहेत. असाच प्रकार इकडे चिखली ते देऊळगावराजा हायवे रोडवरील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या सरंबा ते मुरादपूर या २५ किलोमीटरपर्यत करण्यात आलेल्या चौपदरी सिमेंट रस्त्यावर उघडकीस आला आहे. या हायवे रोडवर सिमेंट रस्त्याला तडे गेल्याने कामगार रोडवरील वाहतूक एकतर्फी काढून रोडची दुरुस्ती दोन ते तीन दिवस करीत राहतात. या रोडचे काम कंपनीने सुपरवायझर शहा यांच्या देखरेखीखाली सोपाविले होते. मात्र शहा यांनी संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून रोडचे काम पाहिजे तसे केले नसल्याने रोडला ठिकठिकाणी तडे जावून रोड ठिकठिकाणी दबला आहे, रस्त्यावरही दिशा दर्शविणारे वळण मार्ग, गतिरोधक, चौफुली मार्ग या ठिकाणी फलक लावले नाही, रोडवर काही ठिकाणी काम होवूनही कामगार एकेरी वाहतूक करून दिली जाते. त्यातच नवीन चौपदरी सिमेंट रोड झाल्याने लहान मोठी वाहने भरधाव वेगाने रोडवरून धावत आहेत. मात्र या धावपळीत ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि वाहनधारकांचे लक्ष विचलित होत असल्याने गेल्या दोन महिन्यापासून अपघाताची मालिका या हायवे रोडवर सुरूच आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात चिखली ते देऊळगावराजा हायवे रोडवर अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सरंबा फाट्यापासून तर मुरादपूर या फाट्यापर्यत २५ किलोमीटर अंतरामध्ये एकापाठोपाठ १३ अपघात घडले आहेत. या तेरा अपघातामध्ये ९ जणांचा बळी गेला असून, १७ जण गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात औषध उपचार करीत आहेत.

याबाबत अंढेरा ठाणेदार गणेश हिवरकर यांनी सांगितले की, या पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर अपघात घडतात, तेही चिखली ते देऊळगाव राजा हायवे रोडवर. हा रोड वाहनधारकांसाठी अवघडीचा आहे तसेच क्राईमसुध्दा जास्त आहे. त्यामुळे वाहनधारकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करुण मोबाईलवर बोलणे टाळावे, हेल्मेटचा वापर करणे, वाहनचा वेग कमी ठेवणे, चौफुलीवर अथवा वळण रस्त्यावर बारीक लक्ष ठेवणे, आदी नियमाचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघात टाळता येईल आणि आपला व दुसर्‍याचा जीव वाचेल, असे ब्रेकिंग महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रताप मोरे यांना ठाणेदारांनी माहिती दिली आहे.
——–
उद्याच्या भागात वाचा, अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा!
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!