नवापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या दळणवळणाची समस्या सोडवून उपाययोजना करा- आ.शिरीषकुमार नाईक
नवापूर जि.नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) तालुक्यात तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागातील दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच अनुषंगाने नवापूर मतदार संघाचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी आपले सर्व नियोजन रद्द करून मतदार संघात शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार व मजूरवर्ग तसेच व्यापारी यांच्या नियमित दळणवळणाची मोठी समस्या सोडविण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी सकाळीच आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते सह तालुक्यातील मुसळधार पावसात नुकसान झालेल्या विसरवाडी येथिल सरपणी नदीवरील राष्ट्रीय महामार्गावरील दुरावस्था झालेल्या पुलाला निमदर्डा येथे अपूर्ण बांधकाम असलेल्या पुलाचे पर्याय बनवलेला रस्ता वाहून गेला त्या ठिकाणी ग्रामस्थांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. तसेच नागन मध्यम प्रकल्प भरडू धरणात लगत केळी- केवडीपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन पुलाचे साईड पट्ट्या तडा गेला व रस्ता दाबला गेला असल्याने भेट दिली. त्या ठिकाणची पाहणी करून महामार्ग चौपदरीकरणात संबंधित कंपनीचे अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना बोलवून तात्काळ उपाययोजना करुन राष्ट्रीय महामार्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून महामार्गावर नागरिकांना सुरळीतपणे प्रवास करून वाहतुकीची समस्या सोडविण्याचे आदेश दिले.(ता.प्र)