पारनेर (प्रतिनिधी) : तालुक्याचे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील यांची जयंती गुरुवार दि. १४ वासुंदे येथे त्यांच्या स्मृतिस्थळास त्यांच्या मूळ गावी अभिवादन करून साजरी करण्यात आली. यावेळी स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत त्यांच्या आठवणींना उपस्थित त्यांच्या कार्यकर्त्यांनी उजाळा दिला.
यावेळी बोलताना सुजितराव झावरे पाटील म्हणाले की स्वर्गीय दादा हे तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले. तालुक्यातील आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय आहे. तालुकास्तरावर राजकारण न करता समाजकारण करून सर्वांना सोबत घेऊन त्यांनी तालुक्याचा विकास केला. आमदार म्हणून दादा त्या काळातील एक निरपेक्ष बुध्दीने काम करणार व्यक्तीमत्व. राजकारणात असून सुध्दा सचोटी, प्रामाणिकपणा आणि नैतिकता त्यांच्या कार्य पध्दतीचे पैलू होते. एक दिलदार राजकारणी विरोधकाला देखील तितकाच सन्मान देणारे दादा जिल्ह्याच वैभव होतं अशा दादांना विनम्र अभिवादन. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या समवेत टाकळी ढोकेश्वर सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन नारायणराव झावरे , पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन बाबासाहेब खिलारी, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती अरुणराव ठाणगे, कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त किसनराव धुमाळ, शरद पाटील, सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे, सरपंच भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकरराव बर्वे, दिलिपराव पाटोळे, बाळासाहेब झावरे, बाळासाहेब शिंदे, किसन नाना वाबळे, लहानभाऊ झावरे, ठेकेदार इंजि. निकिल दाते, नागचंद ठाणगे, पोपटराव हिंगडे, संग्राम झावरे, सोनू मंचरे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.