Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsPune

जरांगेंच्या डोक्यात हवा गेली, ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखवं!

– टी.पी. मुंडेंच्या घणाघाती भाषणाने वातावरण तापले; ‘कोण आला रे कोण आला, जरांगेचा ** आला’; दिली घोषणा!

इंदापूर, जि.पुणे (विशेष प्रतिनिधी) – एकीकडे २४ डिसेंबर संपले की सरकारला पाहून घेऊ, भुजबळांना पाहून घेऊ, अशी धमकी मनोज जरांगे देतोय. राज्यात काय कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल करत सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला अर्थात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला. इंदापूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. असे कोणीही येऊन धमक्या देत असेल तर तुम्हा- आम्हाला अन् सरकारलादेखील गप्प राहता येणार नाही, राज्यात असे अजिबात चालणार नाही, अधिकार्‍यांना देखील तटस्थपणे भूमिका घेऊन कामं करावे लागतील, असेही भुजबळांनी ठणकावून सांगितले. ‘जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं, असे खुले चॅलेंजदेखील याप्रसंगी भुजबळ यांनी दिले. तर याप्रसंगी ‘कोण आला रे कोण आला जरांगेचा ** आला’, अशी घोषणा ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांनी दिल्याने राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राज्यातील सर्व ओबीसी समाजाने तीव्र विरोध सुरू केला असून, त्याच अनुषंगाने ओबीसी नेत्यांनी एकजूट दाखवत राज्यभर ओबीसी एल्गार मेळाव्यांचे आयोजन सुरु केले आहे. याच अनुषंगाने शनिवारी पुण्यातील इंदापूर तालुक्यात ओबीसींचा विराट मेळावा पार पडला. यावेळी जाहीरसभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटलांवर जोरदार टीकास्त्र डागले. ‘जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावे, असे खुले चॅलेंज मंत्री छगन भुजबळ यांनी याप्रसंगी दिले. तर, ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांचे भाषणदेखील चांगलेच गाजले. कारण मनोज जरांगे यांच्यावर टीका करतांना, ‘कोण आला रे कोण आला जरांगेचा बाप आला’, अशी घोषणा मुंडे यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या मेळाव्याला गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, लक्ष्मण गायकवाड, टी.पी. मुंडे आदी नेते उपस्थित होते. याप्रसंगी घणाघाती भाषणात मुंडे यांनी जरांगे पाटलांना चांगलेच फटकारले. ते म्हणाले, की मराठा समाजाने आपले शोषण केले. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तरी आहे का? जरांगेच्या शेजारी आणि आरक्षण मागतो आहे. २०२४ साली ओबीसीचे मुख्यमंत्री छगन भुजबळ झाले पाहिजे. तसेच, उपमुख्यमंत्री प्रकाश शेंडगे यांना करा आणि यांना वठणीवर आणायचे असेल तर गृहमंत्री टी. पी. मुंडे यांना करा. आमच्या हाताला ऊस तोडून फोड आले. दोस्ती भुजबळ साहब के साथ होती है, जरांगेसारख्या गद्दारी करने वालो से नही होती. कोण आला रे कोण आला जारांगेचा बाप आला. तो म्हणतो पांढर्‍या दाढीचा, त्याचा बापाची केस पांढरे आहेत. बापाची केस पांढरे असणार की, जरांगे जरा जपून बोला. जालना येथे हल्ला झाला, पण निलंबित फक्त ओबीसी समाजाचे अधिकारी झाले. शिंदे सरकारला सांगतो आहे, त्यांना ताबडतोब कामावर घ्या, असा इशाराही टी.पी. मुंडे यांनी दिला.मंत्री छगन भुजबळ म्हणाले, की आमचा विरोध अजिबात मराठा आरक्षणाला नाही, येथील झुंडशाहीला आमचा विरोध आहे. जरांगे पाटील एकीकडे माझी लेकरं, माझी लेकरं, असे म्हणत असेल पण त्याच लेकरांनी जर पोलिसांवर हल्ले केले. जाळपोळ केली तर चालते का, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे, याकडे पोलिस अधिकार्‍यांनी तटस्थपणे काम केले पाहिजे, असे म्हणत भुजबळांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. मी काही बोललो तर अनेक विचारवंत बोलायला लागतात. महाराष्ट्रात अशांततेचे वातावरण पसवरले जाते. दोन जातीत भांडणे लावली जात असल्याचे सांगितले जाते. ते जरांगे १५ दिवस फिरत आहेत. सकाळपासून त्याची मिटिंग सुरू होते. आपली मिटिंग रात्री १० वाजता बंद होते. त्यांची मिटिंग रात्री १२ ला, रात्री १ ला, रात्री दोनला. त्यांना परवानगी आहे की नाही माहीत नाही. आता आमच्या सरकारला सांगणे आहे की २७ टक्के आरक्षण आहे. ते पूर्ण भरा. मराठा समाजाला चांगल्या नोकर्‍या दिल्या.

सारथीमार्फत अनेक निधी दिला. एवढ सगळे करून आमची ते पात्रता काढतात, असा टोलाही भुजबळ यांनी हाणला. या सभेदरम्यान भुजबळांनी जरांगे यांच्या व्हिडिओ क्लिप ऐकवत त्यांच्या हिंदीची खिल्ली उडवली. त्यांना हिंदी बोलता येत नाही. जरांगे हे अक्कलेने दिव्यांग झाले आहेत. महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे प्रशासन एक नंबर आहे. अधिकार्‍यांनी तसे काम केले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.


दादागिरीला उत्तर दादागिरीनेच देऊ – भुजबळांचा जरांगेंना इशारा

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिला. तसेच राज्यात सगळे कुणबी होतील, एकही मराठा शिल्लक राहणार नाही, याचा पुनरुच्चार करत, हर्षवर्धन पाटील तुम्ही कुणबी सर्टिफिकिट घेणार का? मोहिते पाटील तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेणार का? असा सवालही भुजबळांनी केला. सध्या २७ टक्के आरक्षण आहे. पण नोकर्‍या ९.५ टक्के इतक्या आहेत. आधी आमचे २७ टक्के आरक्षण पूर्ण भरा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अशी आमची भूमिका असल्याचे भुजबळ यांनी याप्रसंगी सरकारला ठणकावले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!