ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या चिखली तालुका अध्यक्षपदी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे महेंद्र हिवाळे
चिखली (तालुका प्रतिनिधी) – संपूर्ण देशभरामध्ये कार्यरत असलेल्या व ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते अशा ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या भारत सरकार नोंदणीकृत असलेल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या चिखली तालुका अध्यक्षपदी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे चिखली व बुलढाणा तालुक्याचे विशेष प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र तुकाराम हिवाळे यांची निवड करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब केदारे यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी नियुक्तीपत्र देऊन केली. आतापर्यंत सदर समितीचे माध्यमातून जिल्ह्यामध्ये २५ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, अनेक फसवणूक झालेल्या ग्राहकांना पदाधिकाऱ्यांनी न्याय मिळवून दिला आहे. यावेळी आपण समितीच्या माध्यमातून ज्या ग्राहकांचे फसवणूक झाली असेल अशा ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करू, अशीसुद्धा यावेळी नवनियुक्त तालुका अध्यक्षपदी निवड झालेले महेंद्र तुकाराम हिवाळे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपचे मुख्य संपादक तथा उद्योजक पुरूषोत्तम सांगळे, संपादक हेमंत चौधरी, कार्यकारी संपादिका प्राचीताई कुलकर्णी, सहसंपादक कैलास आंधळे, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी बाळू वानखेडे, विशेष प्रतिनिधी संजय निकाळजे, ऋषी दंदाले, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. समाजाच्या विविध स्तरातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
———-