– शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्यांवर आत्महत्येची पाळी – राम डहाके
उदयनगर, ता. चिखली (जिया काझी) – चिखली तालुक्यातील डोंगरगांव, सावरखेड, सारशिव येथील शेतकर्यांनी वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे अपुर्या वीजपुरवठयाअभावी पिके सुकत असल्याने वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्यासह वीज वितरण कंपनीला निवेदने देऊनसुध्दा वीजपुरवठा सुरळीत होत नाही म्हणून दि. २३ नोव्हेंबररोजी सकाळी ८ वाजेपासून शेतकर्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले, तब्बल आठ ते नऊ तासांच्या जलसमाधी आंदोलनानंतर वीज वितरणच्या लेखी आश्वासनाने शेतकर्यांनी जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित आले.
आधीच सततच्या दुष्काळात शेतकरी होरपळत असताना याहीवर्षी कमी पर्जन्यमानामुळे उत्पादन घटले, शेतमालाला भाव नाही, बँकांचे कर्ज घेऊन पाईपलाईन केल्या, कर्ज कसे फेडायचे? आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, त्यात पेनटाकळी प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्यावर शेतकर्यांनी रब्बीची पेरणी केली, मात्र डोंगरगावं, सावरखेड व सारशिव येथील शेतकर्यांना दोन दिवसातून तीनच तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकर्यांची तूर, गहू, हरबरा, मका यासह भाजीपाला पिके सुकायला सुरुवात झाल्याने, सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी शेतकर्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना वेळोवेळी निवेदने दिली. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने उपरोक्त गावातील शेतकर्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा देत सात दिवसांचा अवधी दिला. मात्र कुणीही प्रतिसाद देत नाही म्हणून आत्महत्या केल्यापेक्षा जलसमाधी घेण्याचा पवित्रा घेत शेतकर्यांनी पेनटाकळी प्रकल्पात सकाळी ८ वाजता आंदोलनाला सुरुवात केली. आठ ते नऊ तासांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे यांच्या मध्यस्थीrने पाच दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करू, असे अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्याने, शेतकर्यांनी सुरू असलेले जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित केले.
या जलसमाधी आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंदोलक राम डहाके, संजय ढोणे, गजानन ढोणे, दत्तात्रय सवडतकर, गणेश शिंदे, सुरेश ढोणे, अंकुश जाधव, अरुण कान्हे, अशोक गायकवाड या शेतकर्यांनी जलसमाधी आंदोलन केले, तर याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, माजी सभापती विष्णू पाटील, ज्ञानेश्वर सुरुसे, सतेंद्र भुसारी, रामभाऊ भुसारी, समाधान गीते, अक्रम खासाब, प्रकाश पाटील, नारायण धुमाळ, अरुण गारोळे, पुरुषोत्तम काळे, स्वप्नील दांदडे, विठ्ठल लहाने, दीपक जाधव, योगेश आटोळे, डिगंबर दांदडे, अभिमन्यू दांदडे, दिलीप दांदडे, अमोल दांदडे, नारायण शिंदे, विजय शिंदे, सोनू कान्हे, संभाजी ढोणे, अशोक शिंदे, बबलू गायकवाड, भगवान गायकवाड, वैभव पवार, संजय सोनटक्के, पिंटू सोनटक्के, वैजिनाथ दांदडे यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते, तर यावेळी वीज वितरण कंपनीचे शर्मा, निकम, खाडे, कळसकर तर पोलीस विभागाचे अमडापूर ठाणेदार सचिन पाटील, धनंजय इंगळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.