बिबी (ऋषी दंदाले) – कायस्वरूपी शासकीय सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी होमिओपॅथिक, आयुर्वेदिक व युनानी उपचार करणारे बिबी ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हे संपावर गेले आहेत. याबाबतची नोटीस त्यांनी शासनास दिली आहे.
गेल्या १४ वर्षापासून हे वैद्यकीय अधिकारी चांगल्या प्रकारे होमिओपॅथिक, आयुर्वेदिक व युनानी उपचार देत आहेत. तसेच या वैद्यकीय अधिकार्यांमुळे आयुष उपचारपद्धती बिबीसारख्या परिसरामध्ये नावलौकिकास आली आहे. मागील २५ तारखेपासून शासनाने यावर कोणतेही ठोस पावले उचलले नाही. बिबी ग्रामीण रुग्णालयात येणार्या रुग्णांना आयुर्वेदिक, होमिओपॅथिक व युनानी उपचारांना मुकावे लागत आहे.
आमच्या प्रतिनिधीने आयुष वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, ते मागील १४ वर्षापासून एकदम तुटपुंजा मानधनावर आम्ही काम करीत आहे. आयुष वैद्यकीय अधिकारी यांना कायमस्वरूपी शासन सेवेत समायोजन करून योग्य ती पगार वाढ देण्यात यावी, कोरोनासारख्या महामारीत या वैद्यकीय अधिकारी यांनी जीवाची परवा न करता, एकदम चांगली सेवा दिली. याची दखल घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी फक्त आश्वासने दिली. त्यामुळे हे कर्मचारी संपावर कायम राहण्याचे बोलले जात आहे, प्रशासनाने याची दखल न घेतल्यास काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
———-