BuldanaCrimeVidharbha

वीजेचा जोरदार शॉक लागून तमाशा फडातील दोन कामगार जागीच ठार, एकाची प्रकृती चिंताजनक

– मृत कामगार नारायणगाव व राजूर गणपती येथील, कुटुंबीयांचा एकच आक्रोश

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथील सती कान्हू माता यात्रेवर दुःखाचे सावट पसरले आहे. यात्रेनिमित्त आलेल्या तमाशाच्या फडातील दोघांचा वीजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. वाहनातील तमाशाचे सामान खाली उतरवलत असतांना तिघांना वीजेचा जोरदार शॉक लागून त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची ही दुर्देवी घटना आज (दि.22) दुपारी घडली. तिसरा व्यक्ती गंभीर जखमी झालेला असून, त्याच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंकूश अनिल वारूळे (रा. वारूळ वाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) आणि विशाल गॅरेज भोसले (रा. गणपती राजूर, जि. जालना) अशी या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

Police Station | Buldhana Policeमोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी गावात भरणारी कान्हूसती मातेची यात्रा आजपासून सुरू झाली. या यात्रेत बरेच तमाशाचे फड येतात. जळगाव येथील आनंद लोकनाट्य तमाशा मंडळातील कामगार तमाशाचा फड उभा करीत होते. मालवाहू वाहनातून साहित्य खाली उतरवत असतांना वीज प्रवाह असलेल्या तारांना एकाच्या हातातील पाईपचा स्पर्श झाल्याने त्याच्यासह वाहनाजवळ काम करत असलेल्या दोघांना वीजेचा जोरदार धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, त्यांना प्रथम धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी यातील दोघांना मृत घोषित केले. तिसरा जखमी राहूल शंकर जाधव (२०, रा. घनसोली, मुंबई) याच्यावरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वाहनातील साहित्य काढत असतांना एकाच्या हातातील पाईपचा स्पर्श वीज प्रवाह असलेल्या तारांना झाला आणि त्यातून ही दुर्घटना घडली. मृतांपैकी एक जण साऊंड ऑपरेटर असून एक जण मजूर होता. अंकुश भारुडे, विशाल भोसले या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, अंकुश भारुडे हे मूळचे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील तर विशाल भोसले हे राजुर गणपती( जालना) येथील राहिवासी आहेत. ही दुर्देवी घटना डोळ्यासमोर पहाल्याने अनेकांची घबराट झाली होती. मंडळातील अनेकांना आश्रू अनावर झाले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातही मृतकांच्या पत्नी व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. सिद्धार्थ गरबडे (नजीक पांग्री, बदनापूर, जि. जालना) याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी यावेळी या कुटुंबांना सावरण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे कर्मचाऱ्यांसह दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!