PARANER

पिंपळगाव रोठा येथे आधार कार्ड कॅम्प

पठार भागावरील अनेक ग्रामस्थांनी घेतला कॅम्पचा लाभ

पारनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे कारेगाव, कासारे, पिंपळगाव रोठा या तिन्ही गावांसाठी एकत्रित भारतीय डाक विभाग व भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागामध्ये भव्य आधार कार्ड कॅम्प सोमवार दि. ११ ते मंगळवार दि. १२ या दरम्यान घेण्यात आला.  या आधार कार्ड कॅम्पचा लाभ तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, गरीब,  दलित, आदिवासी कुटुंबाला झाला आहे.  आधार कार्ड मध्ये असलेली दुरुस्ती नवीन आधार कार्ड काढणे यासाठी हा कॅम्प घेण्यात आला होता.

पिंपळगाव रोठा या ठिकाणी घेण्यात आलेल्या या आधार कार्ड कॅम्पचे उद्घाटन सहाय्यक डाक अधीक्षक पश्चिम विभाग अहमदनगर संदीप हदगल व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी संदीप हदगल म्हणाले की भाऊसाहेब शिंदे हे ग्रामीण भागामध्ये आधार कार्डच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवत आहे. त्यांना हा उपक्रम राबवण्यासाठी भारतीय डाक विभाग पूर्ण सहकार्य करत आहे व या पुढील काळातही करणार आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे म्हणाले पिंपळगाव रोठा सारख्या पठार भागावर आधार कार्ड कॅम्प घेऊन पठार भागावरील सर्वसामान्य कुटुंबांसाठी हा एक प्रकारे आधार ठरला आहे कारण आज आधार कार्ड हे एक प्रमुख ओळखपत्र बनले आहे. ते काढण्यासाठी बऱ्याच चक्रा माराव्या लागतात ते सुलभ पद्धतीने मिळावे हा एक हेतू ठेवून हा आधार कार्ड कॅम्प पिंपळगाव रोठा सारख्या ग्रामीण भागामध्ये घेण्यात आला आहे. पुढील काळातही शासकीय योजना व इतर काही लाभ शेतकरी वर्गाला ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी मी व माझे सहकारी नेहमीच प्रयत्नशील असतील.

या आधार कार्ड कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी पिंपळगाव रोठा सरपंच सुरेखा वाळुंज, सरपंच कासारे शिवाजी निमसे, उपसरपंच कासारे शैला घनवट, कासारे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खरात, व्यवस्थापन समिती सदस्य कासारे प्रदीप साळवे, गोकुळ निमसे, कारेगाव सरपंच बापू ठुबे, दादाभाऊ घुले, अशोक पंडित, भास्कर खरात, पिंपळगाव रोठा चेअरमन पप्पू सुपेकर, पिंपळगाव रोठा व्हा. चेअरमन भास्कर पुंडे, मा उपसरपंच पिंपळगाव रोठा बाळासाहेब पुंडे, विठ्ठल झावरे, अंकुश घुले, बाबाजी घुले, कैलास घुले, गंगाराम घुले, संपत ठुबे, जालिंदर राजदेव, वडगाव सावताळचे मंगेश रोकडे, भाऊ शिंदे, नाभिक संघटनेचे नेते संदीप खंडाळे, तसेच पिंपळगाव रोठा कासारे, कारेगाव तसेच तालुक्यातील इतर गावांमधील आधार कार्ड उपस्थित लाभधारक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!