आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : मराठा समाजाला आरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी आळंदीसह सर्कल मधील गावांचे वतीनेआळंदी महाद्वार चौकात साखळी उपोषणास श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून करण्यात आली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाचे वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. यास परिसरातून विविध सेवाभावी संस्था, पक्ष संघटना पदाधिकारी , व्यक्ती, युवक, तरुण, महिला यांचा मोठा प्रतिसाद व पाठिंबा पहिल्या दिवशी मिळाला.
साखळी उपोषणाचे प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, माजी नगरसेवक डि.डि.भोसले पा पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना नेते उत्तमशेठ गोगावले, माजी नगरसेवक रमेश गोगावले, आनंदराव मुंगसे, दिनेश घुले, सचिन गिलबिले, अर्जुन मेदनकर, दिलीप कुऱ्हाडे, विलास कुऱ्हाडे, अजित वडगावकर,शशिकांतराजे जाधव, अरुण कुरे, भागवत शेजूळ, जयसिंग कदम, ज्ञानेश्वर गुळुंजकर, धनंजय ठाकूर, किरण नरके, श्रीकांत काकडे, रामदास दाभाडे, स्वप्नील जगताप यांचेसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी पोलीस बंदोबस्त देत सुसंवाद साधला.
मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत हे साखळी उपोषण सुरु रहाणार आहे. लेखी ग्वाही आणि आरक्षणाचा निर्णय ( जी आर ) मिळत नाही तो पर्यंत साखळी उपोषण शांततेच्या मार्गाने तसेच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सूचना प्रमाणे आंदोलन सुरू रहाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनात दिलेली चाळीस दिवसांची मुदत संपल्याने त्यांनी ही आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनास देखील आळंदीतून जाहीर पाठिंबा देण्यात आला. साखळी उपोषणाच्या माध्यमातून आळंदी सर्कल मधील सर्व गावांच्या वतीने हे उपोषण सकल मराठा समाजाचे वतीने सुरू करण्यात आले आहे.
उपोषणा तत्पूर्वी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना निवेदन देण्यात आले. साखळी उपोषण संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा समोरील महाद्वार चौकात सुरू करण्यात आले आहे. साखळी उपोषणास खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्व्यक पै. बाळासाहेब चौधरी, खेड तालुका दलित पँथर अध्यक्ष रवींद्र रंधवे, बाळासाहेब महाराज शेवाळे, इंद्रायणी सेवा संघ अध्यक्ष विठ्ठल शिंदे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, सचिव दिनेश कुऱ्हाडे, जनार्धन पितळे, डॉ. सुनील वाघमारे, ॲड शाम बवले, शिवाजी पगडे, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे, श्रीक्षेत्र आळंदी ब्रम्हवृन्द अनुष्ठान मंडळ, यशवंत संघर्ष सेना अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, नेचर फाऊंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, बाबासाहेब भंडारी, सिद्धार्थ ग्रुप आळंदी, शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मुंगसे यांचेसह विविध संस्थानी, ग्रामस्थानी येऊन जाहीर पाठिंबा पहिल्या दिवशी दिला. या साखळी उपोषणात माऊली गलबे, बालाजी शिंदे ( भाजपा), शशिकांतराजे जाधव ( शिवसेना ठाकरे गट ) यांनी आपापल्या पदाचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत दिले आहेत. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक पै. बाळासाहेब चौधरी, शिवाजी पगडे आदींनी मार्गदर्शन केले.