लोणार (उद्धव आटोळे) – शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी लोणार येथील धारतीर्थावर श्रद्धास्नान करून सविनय कायदेभंग करत, पुरातत्व खात्याने येथील स्नानास घातलेला बंदीचा बोर्ड हटविला. तसेच, स्वतः स्नान करत सविनय कायदेभंगाने हे धारतीर्थ पर्यटक व भाविकांसाठी खुले करून दिले.
लोणारचे विरजधारतीर्थ ज्यास दक्षिणकाशी अशी उपमा दिलेली आहे आणि या धारतीर्थावर येणार्या लोकांना श्रद्धा स्नान करता यावे म्हणून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी धारतीर्थावर श्रद्धास्नान करून सविनय कायदेभंग करून स्नानास बंदीचा बोर्ड हटविला. याठिकाणी महाराष्ट्रतून नव्हे तर देशातून श्रद्धाळू येतात, या श्रद्धाळू, पर्यटकांच्या येण्यामुळे आमच्या लोणार नगरीचा व्यापार उद्योग चांगल्या स्थितीत चालत होते. येथे श्रद्धाळू व पर्यटक येणे बंद झाले आहे, त्यामुळे लोणारची अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. सदरील लोणारचे धारातीर्थ हे पुरातत्त्व विभागाच्या मालकी हक्काचे नसून, हे गंगा भोगावती नावाने महसूल विभागाच्या नोंदीमध्ये आहे. लोणार येथील विरज धारतीर्थाविषयी निकाल सन १९४४ य.मा. काळे यांनी दाखल केलेल्या याचिका क्रमांक ४८४ नुसार उच्च न्यायालयाने दिलेला आहे, त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, ‘सदरील धारातीर्थ हे हिंदूंच्या मालकीचेच प्राचीन तीर्थस्थान आहे’ असे असतानाही पुरातत्व विभाग उच्च न्यायालयाचा अवमान करून १७ सप्टेंबर रोजी तीर्थ स्नानासाठी बंद केले आहे. जर तीर्थक्षेत्र आणि पर्यटन हे पर्यटकांच्या येण्या जाण्याने झिजत असतील तर आर्ग्याचे ताजमहल, दिल्लीचा लाल किल्ला, अजिंठयाची लेणी, एलोरा येथील कैलास लेणे, बनारस चे काशीतीर्थ, अयोध्याचे नवनिर्मित राम मंदिर, बद्रीनाथ,केदारनाथ सहित सर्व तीर्थक्षेत्र बंद करा आणि त्यानंतरच लोणारचे पावन विरजधारातीर्थ बंद करण्याविषयी विचार करा, धारतीर्थाचे श्रद्धास्थान हे आमच्या हिंदू धर्मासाठी फार महत्त्वाचे व पवित्र मानले जाते व व आम्ही स्वातंत्र्य हिंदू देशात राहतो का यमन देशात राहतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आंदोलन छेडून २१ ऑक्टोबर धारतीर्थाच्या स्वातंत्र्यासाठी बुलढाणा जिल्हा संघटक डॉ.गोपाल बच्छिरे यांनी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, बुलढाणा जिल्हा उपप्रमुख प्रा.अशिषभाऊ रहाटे यांच्या नेतृत्वात डॉ.बछिरे यांनी सविनय कायदेभंग करून धारातीर्थ स्वतंत्र केले.
याप्रसंगी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अॅड. दीपक मापारी, गजानन जाधव सर, श्याम राऊत, किसन आघाव, कैलास अंभोरे, श्रीकांत नागरे, जीवन घायाळ, तानाजी मापारी, सुदन अंभोरे, श्रीकांत मादनकर, इकबाल कुरेशी, गोपाल मापारी, सीताराम जावळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.