मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईत नोकरी किंवा कामानिमित्त स्थिरावलेल्या बुलढाणेकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत गेट टू गेदर केले आणि तब्बल ३४ कुटुंबे आनंदाने त्यात सहभागी एकत्र आलीत. आपली माणसे भेटल्याचा अवर्णनीय आनंद सर्वांच्या चेहर्यावर दिसून आला. बदलापूर तालुक्यातील कोंडेश्वर तीर्थस्थळ या निसर्गरम्य ठिकाणी या कुटुंबीयांची नुकतीच सहल गेली होती.
बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांतून मुंबईमध्ये नोकरी, कामाकरिता आलेल्यांची माहिती घेऊन या गेट टुगेदरचे आयोजक शेषराव सुसर पाटील, भिवंडी यांनी ‘मुंबईतील बुलढाणेकर’ हा व्हाट्सएप ग्रुप तयार केला. सर्व जाती, धर्माचे बुलढाणेकरांना ग्रुपमध्ये जोडले. पाहतापहाता या ग्रुपचे तब्बल ४३४ सदस्य झाले. त्यांच्या माध्यमाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांची कुटुंबे जोडल्या गेली. त्यांच्यात संवाद सुरू झाला. महानगरीमधील एकाकीपण दूर झाले. काही समाजबांधव, दूरचे नातेवाईक निघाले. यामुळे ग्रुपच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, जिल्हावासी एकवटत आहे.
सुसर पाटील व भारत स्काऊटस् आणि गाईडस् ठाणेचे जिल्हा संघटन आयुक्त किरण लहाने यांनी ग्रुपचे सदस्यांचा परिवारासह ‘गेट टूगेदर’ ठेवण्याची संकल्पना मांडली. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला व या सहलीत तब्बल ३५ कुटुंबे सहभागी झालीत. नजीकच्या बदलापूर तालुक्यातील कोंडेश्वर या निसर्गरम्य तीर्थस्थळी ही सहल गेली. सर्व सदस्यांनी या सहलीचा मनमुराद आनंद लुटला. या गेट टुगेदरचे आयोजक शेषराव सुसर पाटील भिवंडी, रामेश्वर खरूळे कल्याण, किरण लहाने डोंबिवली, पांडुरंग खडूळ बदलापूर, रामेश्वर गव्हाणे बदलापूर, विनोद सुसर पाटील बदलापूर यांनी या सहलीचे योग्य नियोजन करून हे गेट टूगेदर यशस्वी केले.