पारनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडगाव सावताळ येथे आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र वडगाव सावताळ ते श्री क्षेत्र प्रति पंढरपूर पळशी या दरम्यान दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव सावताळ येथील वारकरी भक्त मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. वडगाव सावताळ येथील ग्रामस्थांनी व वारकऱ्यांनी हा दिंडी सोहळा अनोखा होण्यासाठी वृक्षदिंडीचेही आयोजन केले होते. ही संकल्पना वडगाव सावताळ येथील ग्रामस्थ व भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात आली.
वृक्षदिंडी सोहळा साजरा करताना वृक्षारोपणाचा सामाजिक संदेश वडगाव सावताळ येथील ग्रामस्थ व वारकऱ्यांनी दिला. या दिंडी सोहळ्यामध्ये गावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वडगाव सावताळ येथील महिला भगिनी युवक वारकरी यांचाही सहभाग मोठा होता. या कार्यक्रम सोहळ्यासाठी वनविभागा चे अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब शिंदे म्हणाले फक्त झाडेच लावून राहायचं नाही तर त्याचे संगोपनही करायचे आहे. प्रदूषण खूप वाढलेला आहे. झाडे नाहीसे झाल्यामुळे तापमान ही खूप वाढत आहे. म्हणून आपण आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी वडगाव सावताळ येथील दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष ठकाबाबा रांधवण, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे, सरपंच बाबासाहेब शिंदे, मा. चेअरमन सर्जेराव रोकडे , गो. या. रोकडे, भाऊसाहेब दाते, ज्येष्ठ समाजसेवक गुलाब अण्णा रोकडे, नामदेव रोकडे, बबन रोकडे, सतीश तिखुळे वन विभागाचे प्रशासकीय अधिकारी राहणे साहेब, भालेकर साहेब, वन विभागाचे सर्व कर्मचारी तसेच अहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेचे समन्वयक मोहन रोकडे, दादाभाऊ रोकडे, युवा नेते योगेश रोकडे, सुदाम व्यवहारे, मच्छिंद्र रोकडे, भाऊ शिंदे , अर्जुन रोकडे ,मंगेश रोकडे, दत्ता रोकडे, संदीप निकम संतोष रोकडे, तुकाराम साळुंखे, बबन रोकडे, विणेकरी सखाराम नाना रोकडे, दगडू सांगळे,पोपट सरोदे, इतर वारकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सर्वसामान्य जनतेचे सेवक भाऊसाहेब शिंदे यांनी वडगाव सावताळ येथे वृक्षदिंडी सोहळ्याचे आयोजन करत सामाजिक संदेश दिला आहे. भाऊसाहेब शिंदे व त्यांचे सहकारी विविध क्षेत्रांमध्ये चांगले सामाजिक काम करत असून गोरगरीब जनतेसाठी सुरू असलेले हे काम नक्कीच प्रेरणादायी आहे.
– भाऊ वि. शिंदे, (ग्रामस्थ, वडगाव सावताळ)