खामगावात शीतल ट्रॅव्हलमधे चोरी: दिव्यांगाची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळटाळ
खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र): – ‘ सद्राक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांच्या नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. होतो मात्र खामगाव या ब्रीदवाक्याला पोलिसांनी हरताळ फासला आहे . चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या दिव्यांग फिर्यादीला पावती घेवून या मग तक्रार नोंदवू असा दम पोलिसांनी भरला पावती आणल्या नंतर झेरॉक्स घेऊन या असे पोलिसांनी सांगितले कारण होते चोरीचे. येथील शीतल ट्रॅव्हल वर 11 च्या रात्री चोरी झाली. त्यामधे प्रवाशाने ठेवलेले सिलिंडर व खुर्च्या चोरी गेल्या. याबाबत शीतल ट्रॅव्हल चालक तक्रार देण्यास गेला असता त्याच्यावर पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली आणि सिलिंडरची पावती मागितली व तक्रार घेण्यास टाळटाळ केली. मात्र सिलिंडर ज्याचे होते तो प्रवाशी पुण्याला गेला आहे आणि तक्रार देणाऱ्याजवळ पावती नाही. तर तक्रार घेणार नाही असा पवित्रा पोलिसांनी घेतला. डीवायएसपी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही लवकर दखल घेतली नाही. याकडे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक, एएसपी श्रवण दत्त यांनी लक्ष देवून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आला आहे. वरली, जुगार , विनापरवाना दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे . चोरीच्या घटना मधे वाढ होत आहे . महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीची छेडछाड महिलांची छेडछाड होत आहे. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गुटखा तर मोठ्या प्रमाणात शहरात विक्रीस येत आहे . याबाबत पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.
खामगाव येथील अजय गणेश बोरूडे वय 27 रा. जुना फैल हे दिव्याग असून यांचे रेल्वे स्टेशन जवळ शीतल ट्रॅव्हल आहे. ते प्रवाशी ने आणण्याचे काम करतात . दरम्यान 10 जुलै रोजी दुपारच्या सुमारास पारखेड येथील अशोक लहार हे पुणे येथे जाण्यासाठी शीतल ट्रॅव्हल्स येथे आले असता त्यांनी सोबत सिलिंडर आणले होते . मात्र ट्रॅव्हल्स चालक यांनी ट्रॅव्हल्स मधे सिलिंडर नेण्यास मनाई केली त्यामुळे प्रवाशी अशोक लहार यांनी सिलिंडर हे शीतल ट्रॅव्हल्स येथे ठेवून व नातेवाईक येवून घेवून जातील असे सांगितले दरम्यान 11 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ट्रॅव्हल्स मधील सिलिंडर आणि 5 खुर्च्या लंपास केल्या . ही बाब अजय बोरुडे यांना 12 जुलै रोजी सकाळी निदर्शनास आली. याबाबत तक्रार देण्यासाठी अजय बोरुडे हे खामगाव शहर गेले असता डायरी अंमालदर कुरेशी यांनी तक्रार घेण्यास टाळटाळ केली. व सिलिंडरची पावती आणा मग घेवू असे म्हटले यावेळी बोरुडे यांनी सदर सिलिंडर हे प्रवाशाचे आहे . ते अनोळखी आहेत . त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट झाला की पावती आणून देतो . तुम्ही रिपोर्ट घ्या मात्र डायरी अमलदार यांनी मात्र त्यांनी टाळाटाळ केली . मग दिव्यांग फिर्यादिने प्रवाशी अशोक लहार यांच्याशी फोनवर संपर्क साधून पावती व्हॉट्सअँप बोलावून घेतली . तर पाऊस सुरूच होता. यावेळी फिर्यादीने डायरी अंमलदार यांना सिलिंडरची पावती व्हॉट्स अप आहे असे सांगितले असता डायरी अंमलदार यांनी झेरॉक्स आणा तरच तक्रार घेवू असे सांगितले. यावेळी दिव्यांग फिर्यदिने डायरी अंमलदार यांना पाऊस सुर आहे नंतर आणून देता असे सांगितले मात्र पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नाही . यावेळी डीवायएसपी कोळी यांना संपर्क केला असता त्यांनी दिव्यांग फिर्यादीची तक्रार घ्यावी या बाबत कोणतीही तप्तरता दाखवली नाही. यावेळी दिव्यांग फिर्यदिने पावसात जाऊन सिलिंडर पावतीची झेरॉक्स आणली त्यानंतरही डायरी अमलदार व पोलिसांनी तक्रार घेण्यास तप्तरता दाखवली नाही. तक्रार घेताना पोलिसांनी फिर्यादीलाच आरोपी समजून अनेक प्रश्नाची सरबत्ती केली. तक्रार घेताना पोलिसांनी तयार केलेली तक्रार दोन वेळा तयार केली. आधीच घाबरलेल्या दिव्यांग फिर्यादी आणखीच घाबरला . शेवटी पोलिसांनी औदार्य दाखवत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी येत असलेल्या फिर्यादीची अशी प्रतारणा होत असेल तर तक्रार देण्यास सामान्य व्यक्ती धजावत नाही.
याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चारविया , अप्पर पोलीस अधिक दत्त यांच्यासह वरिष्ठांनी दखल घेवून कारवाई करावी अशी मागणी होत आहे