Dhule

गॅस दरवाढीविरोधात गोवर्‍या विकून आंदोलन

धुळे (ब्रेकिंग महाराष्ट्र) – घरगुती गॅस दरात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ आज धुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गोवर्‍या विकून केंद्र शासनाचा निषेध केला. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान देवपूर नेहरू नगर परिसरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी इंधन दरवाढीमुळे महिलांचा स्वयंपाक दर कोलमडला असून, केंद्र सरकार जाणून बुजून उद्योगपती मित्र व व्यापार्‍यांच्या हितासाठी देशावर महागाई लादत असल्याचा आरोप करण्यात आला, महागाई दर कमी न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस महिला रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!