धुळे (ब्रेकिंग महाराष्ट्र) : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात २२ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच पांझरा नदी दुथडी वाहत आहे.
पूर पातळी वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने सावरकर मार्गावरील काजवे पूल व गणपती पुलावरील वाहतूक बंद केली असून, पोलीस प्रशासनासह महानगरपालिका व आपत्ती प्रशासन याठिकाणी चोख बंदोबस्तात आहे. नागरिकांना वाहतुकीच्या पर्यायी व्यवस्थेसाठी ब्रिटिशकालीन असलेल्या मोठ्या पुलावर वाहतूक सुरू ठेवत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply