– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने फोडली होती वाचा; रविकांत तुपकरांनी वेधले होते सरकारचे लक्ष!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात येलो मोजेकमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी तालुका प्रशासनाला काढले आहेत. विशेष बाब म्हणजे, याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करून राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना निवेदन देऊन याप्रश्नी सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सरकारच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे हाती घेतले आहेत.
खरिप हंगाम २०२३ मध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता, तापमानातील बदल तसेच इतर काही कारणांमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा (येलो) मोजेक हा विषाणूजन्य रोग तसेच खोड़कूज व मुळकुज या बुरशीजन्यरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असल्याचे शासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांत पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग तसेच खोड़कूज व मुळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्याने तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यक यांच्याकडून तात्काळ पंचनामे करून तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर करावा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना 11 ऑक्टोबररोजी दिले आहेत.
विशेष म्हणजे, याबाबत सविस्तर वृत्त सर्वप्रथम ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रकाशित केले होते. तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही शासनाकडे मागणी लावून धरली होती.
———–