धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही; गजानन बोरकरांनी ठणकावले!
– पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्यात आले, पण उपोषणाकडे फिरवली पाठ, समाजातून तीव्र संताप व्यक्त!
लोणार (उध्दव आटोळे) – लोणार व मेहकर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली असून उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. आज पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे बुलढाणा जिल्ह्यात होते. परंतु, त्यांनी उपोषणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे धनगर समाज बांधवांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच असून इंग्रजीमध्ये आर ऐवजी डी असा शब्द वापरण्यात आला आहे. ‘ड’ ऐवजी ‘र’ असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नाही, त्यामुळे ही चूक दुरूस्त करण्यात यावी.धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात यावे या मागणी करता महाराष्ट्रभर आंदोलने सुरू असताना मेहकर येथे उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत धनगर समाजाला एस.टी.आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषणापासून माघार नाही.संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाज आपल्या हक्कासाठी आंदोलन व उपोषणाच्या पवित्र्यात आहे.धनगर समाजावर झालेला हा अन्याय अजून किती दिवस सहन करायचा असा प्रश्न धनगर समाज बांधवांनी सरकारला केला आहे.
मेहकर व लोणार येथील समाज बांधवांनी १ आक्टोंबरपासून उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली उपोषण योद्धा गजानन बोरकर त्याचबरोबर साखळी उपोषण कर्ते प्रा.विठ्ठल गिलवरकर,मुरलीधर लांभाडे,ॲड.रामेश्वर शेवाळे,विष्णू साखरे, धनंजय रेंदाळे,एकनाथ खराट, शिवाजी औदगे,धोंडूची गायकवाड रामभाऊ लोणकर,गणेश वैद्य,राजू खोरणे,रवींद्र गुरव,सुरेश काळे, रामप्रसाद खोडवे,सतीश पातळे,सुरेश औद्योगिक,प्रल्हाद गोरे,पुरुषोत्तम औदगे,दत्ता खारट,कुंदन हुले,निलेश पावडे,देविदास काटे,अनिल ढवळे,बद्री गावडे यांच्यासह दोन्ही तालुक्यातील शेकडो धनगर समाज बांधव उपोषणामध्ये सहभागी असून मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित होत असुन शासनाविषयी धनगर समाज बांधवांमध्ये आक्रोश निर्माण होताना दिसत आहे.