BULDHANAChikhaliVidharbha

तात्यासाहेबांचे प्रेरणास्थळ ऊर्जास्थळ व्हावे – खा. मुकूल वासनिक

– सत्ता मिळवणे हाच आजच्या राजकारण्यांचा उद्देश असल्याची खा. वासनिकांनी व्यक्त केली खंत!

चिखली/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – स्व. तात्यासाहेब बोंद्रे हे तपस्वी होते, त्यांनी विचारांशी कधी तड़जोड़ केली नाही. चिखलीसारख्या ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाची गंगोत्री आणली. एवढे विश्व निर्माण केल्यानंतरही त्यांना कधी मोह सुटला नसून, त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. अनुराधा परिवार उभारत असलेले त्यांचे प्रेरणास्थळ निश्चितच ऊर्जास्थळ ठरेल, असा आशावाद अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खा. मुकूल वासनिक यांनी व्यक्त केला. आज राजकारणातून सत्ता मिळवणे हाच एकमेव उद्देश असल्याचे दिसत असून, नुसते सत्तेसाठी इकड़ून तिकड़े जाण्याचा प्रकार आपण अनुभवतो आहोत. जनतेच्या कामाचे कोणाला देणेघेणे नाही, अशी खंतदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.

ऋषीतुल्य कर्मयोगी सिध्दीविनायक उर्फ तात्यासाहेब बोंद्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणार्‍या भव्य प्रेरणास्थळाचे भूमिपूजन चिखली येथील तपोभूमी येथे खा.मुकूल वासनिक यांच्याहस्ते १२ सप्टेंबररोजी पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. राहुलभाऊंकडून आपल्याला खूप अपेक्षा आहेत. आमदार म्हणून ते विधानसभेत पोहोचले. त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे त्यांची उंची अधिक वाढू शकते, असे सूचक विधान यावेळी खा. वासनिकांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी पद्मश्री ड़ॉ. तात्याराव लहाने, आ. धीरज लिंगाड़े, आ. राजेश एकड़े, आ. किरण सरनाईक, जिल्हा प्रभारी नाना गावंड़े, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा माजी आ. रेखाताई खेड़ेकर, शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेड़ेकर, शाम उमाळकर, विजय अंभोरे, अ‍ॅड़. गणेशराव पाटील, संजय राठोड, स्वाती वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अलकाताई खंड़ारे, रामविजय बुरूंगले, अ‍ॅड़. अनंतराव वानखेड़े, ज्ञानेश्वरदादा पाटील, हाजी दादूशेठ, धनंजय देशमुख, नरेश शेळके, रशीदखॉ जमादार, अरविंद कोलते यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पद्मश्री तात्याराव लहाने यांनी आई व़डिलांची सेवा करतात ते जीवनात यशस्वी होतात असे सांगून, राहुल बोंद्रे यांनी आईव़डिलांचा शब्द खाली पड़ून दिला नाही. स्व.तात्यासाहेबांनी रूग्णसेवा केली, तीच परंपरा महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते पुढे नेते आहेत. मोबाईलचा वापर कमी करावा, तसेच मधुमेह असणारांनी गुळाचा चहा पिऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी आ.किरण सरनाईक, शाम उमाळकर, प्रा.नरेंद्र खेड़ेकर, हर्षवर्धन सपकाळ, सौ.रेखाताई खेड़ेकर, अ‍ॅड़. गणेशराव पाटील आदिंनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात राहुल बोंद्रे म्हणाले की, स्व. तात्यासाहेबांनी अनेक संस्था उभ्या केल्या. यासाठी सर्वाधिक मदत स्व.बाळकृष्ण वासनिक व खा. मुकूल वासनिक यांची मिळाली. १२ सप्टेंबर या तात्यासाहेबांचा जन्मदिनी गेल्या तीस वर्षापासून नेत्रतपासणी शिबीर घेत असून, येथे जगातील सुंदर शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी अनेकांनी नेत्रतपासणी व नेत्रचिकित्सा शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी महाप्रसाराचे आयोजनदेखील करण्यात आले होते. यावेळी सौ. वृषालीताई बोंद्रे, बी.टी.जाधव, साजिद पठण, मनोज कायंदे, अनिकेत मापारी, ए.टी.देशमुख, मंगला पाटील, संतोष आंबेकर, लक्ष्मणराव घुमरे, बाळाभाऊ भोंड़े, दिलीप जाधव, साहेबराव सरदार, हरिष रावळ, विष्णू पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, नंदु बोरे, दीपक देशमाने, रिजवान सौदागर, शैलेश सावजी, डॉ. इसरार, दीपक खरात, नंदू शिंदे, कुणाल बोंद्रे, आतरोद्दीन काझी, सुनील तायड़े, अंकुशराव वाघ, संतोष वानखेडे, सचिन बोंद्रे, गजानन खरात, देवानंद पवार, प्रभाकर वाघ, निसार चौधरी, सुनील सपकाळ, दत्ता काकस, कपील खेड़ेकर, अ‍ॅड़. विजय सावळे, नंदु कर्हाड़े, श्लोकांनद ड़ांगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरेख संचलन प्रा. उन्मेश जोशी तर उपस्थितांचे आभार अनुराधा बँकेचे उपाध्यक्ष ड़ॉ. व्ही. आर. यादव यांनी मानले.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!