Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

पोलिसांनी झडप घातली; महाराष्ट्र पेटता पेटता वाचला!

– सिंदखेडराजात मनसे पदाधिकार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न उधळला; मोताळा तालुक्यातही अंगावर ओतून घेतले पेट्राेल!

बुलढाणा/लोणार/बिबी (जिल्हा प्रतिनिधी/प्रतिनिधी) – मराठा समाजावरील राज्य सरकारच्या नृशंस व भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍याने आज (दि.४) आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा कार्यकर्ता पेट्रोलची बाटली व आगपेटी घेऊन सिंदखेडराजा तहसील कार्यालयात घुसला होता. परंतु, तैनात असलेल्या पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. दुसरीकडे, मोताळा येथेही एकाने अंगावर पट्रोल ओतून घेतले. या ठिकाणी दुर्देवाने काही अनुचित प्रकार घडला असता तर, आधीच संतप्त असलेला उभा महाराष्ट्र पेटून उठला असता. दरम्यान, लोणार, बिबी, सुलतानपूर, खामगाव, चिखलीसह जिल्हाभरात अनेक ठिकाणी मराठा समाजाने तीव्र आंदोलने केली. तसेच, कडकडीत बंद पाळला. यावेळी राज्य सरकारचा तीव्र धिक्कार करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकावरील अमानुष लाठीमारचा वणवा राज्यात पेटला असून, आज (दि.४) सिंदखेड़राजा येथे मनसेचे विधानसभाप्रमुख सिध्दू गव्हाड़ यांनी हातात पेट्रोलची बाटली घेऊन गनिमी काव्याने तहसील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने झडप घालून या पदाधिकार्‍याला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व राज्यात आधीच पेटलेला वणवा पुन्हा भडकता भडकता वाचला. या संतप्त पदाधिकार्‍याने जीवाचे काही बरेवाईट केले असते, तर राज्य सरकारला पेटलेली ही आग विझवणे मुश्कील झाले असते. यावेळी चांगलीच गर्दी जमली होती. तसेच, सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

लोणार तालुक्यात शंभर टक्के कडकडीत बंद
अंतरवाली सराटी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील सकल मराठा समाजाच्यावतीने लोणार तालुका बंदची हाक देण्यात आली दिली होती. आज सकाळपासूनच शहरात सर्व व्यापारी प्रतिष्ठाने शंभर टक्के बंद ठेवली गेली. तसेच, लोणार तालुक्यातही सकल मराठा समाज, व इतरही समाज संघटना यांच्याद्वारे बंदची हाक देण्यात आली दिली होती. तालुक्यात शनिवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, आज सर्व व्यापारी प्रतिष्ठान शंभर टक्के कडकडीत बंद राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

सुलतानपूर बंद व रस्ता रोको
मराठा समाजावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सुलतानपुरातही रस्ता रोको करण्यात येऊन बंद पाळण्यात आला. या आंदोलनात शिवसेना (ठाकरे), महाविकास आघाडीसह सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी झाले होते. मुस्लीम समाजाची संख्या लाक्षणीय होती. सर्व मुस्लीम समाजाने या आंदोलनासाठी पाठिंबा दिला होता. याप्रसंगी शिवसेना नेते डॉ. गोपाल बच्छीरे, अ‍ॅड. दीपक मापारी, रमेश भानापुरे दादा, प्रसेनजित बच्छिरे, शेख जमीर, शेख माजीद, अमीर, मोहम्मद मुदस्सर, शेख सद्दाम शेख बाबू मोईन शेख, जाकीर खान, लालू भाई मुल्लाजी, खुद्दुस मुल्लाजी, सय्यद अजीम, शिवप्रसाद (बंडूभाऊ) जोगदंड, शेख वसीम शेख गफार, युनूसशहा खुर्शिदशहा, रमेश अर्जुन मोरे, रोशन खान, फिरोज खान, खाजाभाई, बादल पटेल, जमीर खान, फिरोज खान, अजय बच्छिरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बिबी येथे कडकडीत बंद
मराठा समाजावरील हल्ल्याचा बिबी येथे कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. या बंदमध्ये मराठा समाजासह व्यापारीवर्ग व सर्व जाती-धर्माचे नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी संतोषभाऊ बनकर, पवनभाऊ दंदाले, अशोक नरववाडे, राम जाधव, रमेश खंडागळे, केशव डहाळके, विनोद तनपुरे, कुणाल बनकर, संतोष समाधान बनकर, कैलास मोरे, गणेश मुळे, सोनू बनकर, सुनील तळेकर, दीपक घुले, अमोल बनकर, अजय पाटोळे, विशाल केंदळे, विनोद जाधव, बाळू काकडे, माधव डुकरे, राम डुकरे, गणेश अनंता पाटोळे, आकाश जाधव, डुकरे, रियाज भाई व समाज बांधव आणि गावकरी उपस्थित होते. बंददरम्यान बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!