पारनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे नेते अहमदनगर जिल्ह्याचे भूषण माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शिंदे-फडणवीस सरकार मधील नवीन तयार होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचे चांगले मंत्रिपद मिळावे, अशी मागणी पारनेर तालुक्याचे युवा नेते राहुल पाटील शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून परिचित असलेल्या पळशी येथे दर्शन घेत विठ्ठलाकडे साकडे घातले आहे.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखे कुटुंबाचे विकास कामांमध्ये मोठे योगदान असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात नव्याने तयार होत असलेल्या मंत्रिमंडळामध्ये चांगल्या दर्जाचे खाते मिळावे, त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा त्यांच्या हातून व्हावी. विखे साहेबांना नामदार म्हणून लवकर संधी मिळेल, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, अशी आशा करूया. आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर पळशी या तीर्थक्षेत्री राहुल पाटील शिंदे दर्शनासाठी आले होते .यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रसिद्धी प्रमुख व सचिव प्रशांत कांबळे त्यांचे सहकारी तसेच अहमदनगर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे हे उपस्थित होते.
यावेळी श्री क्षेत्र पळशी देवस्थानचे अध्यक्ष मिठूशेठ जाधव, पळशी गावचे माजी सरपंच संतोष जाधव, उपसरपंच आप्पासाहेब शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष गांधी, युवा उद्योजक आनंद गांधी यांनी यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान व सत्कार केला. पळशी येथील ग्रामस्थ देवस्थानचे विश्वस्त व विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.