PARANER

विठ्ठल भक्तीने मन प्रसन्न होते : सुजित झावरे पाटील

मंदिर परिसर विकासासाठी भरीव निधी देणार

पारनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र पळशी येथे आषाढी एकादशी निमित्त अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील जिल्ह्यातील भागातून विठ्ठल भक्त विठ्ठलाचा गजर करत पळशी या ठिकाणी उपस्थित होते. श्री विठ्ठल राही रुख्मिणी मंदिरामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे हस्ते पहाटे ५ वाजता महाआरती व पूजा करण्यात आली.

प्रति पंढरपूर पळशी या ठिकाणी विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.  यावेळी सुजित झावरे पाटील यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.  सुजित झावरे पाटील यांनी श्री विठूरायाकडे सर्वांना सुख, समाधान, शांती लाभो, यावर्षी पाऊस चांगल पडावा, माझ्या शेतकरी राजाला चांगले दिवस येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना केली.  यावेळी बोलताना झावरे पाटील म्हणाले की, खऱ्या अर्थाने विठ्ठल भक्तीने मन प्रसन्न होते ईश्वराची सेवा करत राहणे यामध्येच मी धन्यता मानतो. नशिबापेक्षा ईश्वर शक्ती मोठी आहे त्यामुळे सर्वांनी ईश्वर भक्ती केली पाहिजे.

माजी सरपंच मिठूशेठ जाधव मंदिराचे प्रमुख आण्णा काका पोळ, पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, महेश पाटील ढुस, वासुंदे गावच्या सरपंच सुमनताई सैद, भाऊसाहेब सैद, दिलीपराव पाटोळे, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, भागूजी दादा झावरे, मधुकर बर्वे सर, मा. सरपंच संतोष जाधव, बाळासाहेब शिंदे, उपसरपंच आप्पासाहेब शिंदे, मोढवे सर, मा उपसरपंच वनकुटे भास्कर शिंदे, युवा नेते दिपक गुंजाळ, ऋषिकेश गागरे, शिवाजी शिंगोटे, बन्सी गागरे, वनकुटे गावचे युवा नेते बापू काळणर, महादू पठारे, भाऊ पाटील गागरे, विकास गांधी, संतोष सुडके, रवींद्र शिंदे, भूषण मोढवे, भाऊसाहेब मोढवे, कारभारी शिंदे, गणेश हाके, उमा मोढवे तसेच तालुक्यातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सभामंडप, भक्त निवास, पेव्हींग ब्लॉक बसविणे, तसेच परिसर सुशोभीकरण करणे इ. विकास कामासाठी आतापर्यंत 75.00 लक्ष रु. विकास कामे करण्यात आली आहे. यापुढे ही सदर मंदिरासाठी निधी देणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!