चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील कवठळ येथे गेल्या ७१ वर्षांच्या परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर अखंड हरिनाम व चतुर्मासाची परंपरा कायम ठेवली आहे. सालाबादाप्रमाणे याहीवर्षी सकाळी गावातील विठ्ठल रुक्मिणी व दक्षिणमुखी हनुमंताच्या मूर्तीला पुजारी हभप संतोष महाराज कर्हाडे यांच्याहस्ते विधिवत अभिषेक व पूजन करण्यात आले. मानाच्या विण्याची नगरप्रदक्षणा काढून विणा उभारण्यात आला. तसेच, माजी सैनिकांच्याहस्ते वटवृक्षारोपण करण्यात येऊन चतुर्मास प्रारंभ झाला.
आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत हा चतुर्मास उभारण्यात येतो. या दरम्यान सलग चार महिने विणा सांभाळण्याची जबाबदारी ग्रामस्थ मोठ्या भक्ती भावाने जोपासतात. याशिवाय दररोज नित्यनियमाने सकाळी काकड आरती, सांजआरती, हरिपाठ, पोथी वाचन केले जाते. अशा या सोहळ्यास आज दिनांक १० जुलै रोजी प्रारंभ झाल्याने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या दिंडी सोहळ्यामध्ये गावातील दामू अण्णा वाघमारे, ज्ञानेश्वर रामभाऊ कर्हाडे, दीपक दगडू वाघमारे यांच्याकडून फराळ व चहा पाण्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सुखदेव गावंडे, दौलतराव पवार, सुदामराव कह्राडे, एकनाथ राऊत, विष्णू वाघमारे, वसुदेव गावंडे, दिगंबर कह्राडे, उत्तमराव मेव्हनकर, दत्ता गावंडे, भास्करराव गायकवाड, योगेश वाघमारे कचरुबा पडघान, शिवाजी कह्राडे, यांच्यासह गावातील भाविक, महिला ,तरुण, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा जोपासली
कवठळ येथे दरवर्षीच चतुर्मास काळात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मागील वर्षी चातुर्मास समाप्तीच्या निमित्ताने भव्य कृषी मेळावा घेऊन परिसरातील आदर्श शेतकर्यांचा सन्मान व प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांचा मार्गदर्शन मेळावाही आयोजित केला होता. तर यावर्षी काही वेगळ्या सामाजिक उपक्रम म्हणून माजी सैनिक रतन गंगाराम निंभोरे व अनिरुद्ध सोनबा काकडे या माजी सैनिकांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील सरपंच श्रीराम गावंडे माजी सरपंच संजय वाघमारे, छगन कह्राडे, गणेश वाघमारे ,पंढरी गावंडे, संजय दळवी, गावंडे गुरुजी, रामदास पडघान यांच्यासह अनेक तरुण मंडळी यावेळी उपस्थित होती.
Leave a Reply