BULDHANAHead linesVidharbha

अखेर ‘शासन आपल्या दारी’ची तारीख ठरली!

35 हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांची राहणार उपस्थिती

बुलडाणा (प्रशांत खंडारे) – सुरुवातीला मेहकर येथे होणारा आणि चार वेळा तारखा रद्द झालेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आता 3 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील गुलाबचंद नगर, कोऱ्हाळे लेआउट परिसरात होण्याचे निश्चित झाले आहे. या कार्यक्रम स्थळाची पाहणी आज, 27 ऑगस्टला आमदार संजय गायकवाड व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुलढाणा पार पडत आहे. आज कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात आम. संजय गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते उपविभागीय अधिकारी जाधव मंडप डेकोरेशनचे संचालक दायमा आदींनी स्थळाची पाहणी केली. जनतेच्या समस्या थेट त्यांच्यात जाऊन ऐकणे आणि समस्या निकाली काढण्यासोबतच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने “शासन आपल्या दारी” उपक्रम सुरु केला आहे. मात्र या कार्यक्रमाच्या आतापर्यंत चार वेळा तारखा बदलल्या गेल्या आहेत. आता हा कार्यक्रम 3 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर झाले आहे. यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी मेहकर येथे पहिल्यांदा तारीख घोषित करण्यात आली होती. नंतर 13 ऑगस्ट झाली, पुन्हा नवीन तारीख 19 ऑगस्ट झाली. यात बदल होऊन तारीख 29 ऑगस्ट झाली आणि स्थळ मेहकरवरून बुलढाणा झाले. आता स्थळ बुलढाणाच असून तारीख बदलून 3 सप्टेंबर झाली आहे.


चोख व्यवस्था;हॉस्पिटलची उभारणी!

‘शासन आपल्या दारी’ या भव्य कार्यक्रमांमध्ये सुमारे 35 हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे. पार्किंग व्यवस्था व सभास्थळावर पाच ते दहा बेडचे अत्यावश्यक असे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. शिवाय या ठिकाणी शहरातील सर्व तज्ञ डॉक्टर मंडळींचा चमु देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. या कार्यक्रमादरम्यान शासनाच्या प्रदर्शनी विविध प्रकारचे स्टॉल देखील लावण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन आम. संजय गायकवाड यांनी केले आहे.


अतिवृष्टीतील 70 हजार नुकसानग्रस्तांना मिळेल लाभ!

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागांसोबत महिला आर्थिक विकास महामंडळ, बचतगटांचा सहभाग असणार आहे. आतापर्यंत 5 लाख 75 हजार लाभार्थ्यांना या अभियानात लाभ देण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दिवशी आणखी दिड लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियानात आणखी लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध विभागांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. याठिकाणी रोजगार मेळावा, आरोग्य शिबीरासह विविध विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना आणण्यासाठी 350 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना डीबीटी, धनादेश, साहित्य वाटप आदी लाभाचे प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार आहे. त्यासोबत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले 70 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!