‘दर्पण समाजसेवा गौरव’ पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळेंसह सहा पत्रकार सन्मानित!
– सन्मानमूर्तींत ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिरसाट, धनराज ससाने, मयूर निकम, कृष्णा सपकाळ व ज्ञानेश्वर ताकोतेंचा समावेश
शेगाव (तालुका प्रतिनिधी) – पत्रकारांसाठी झटणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या नागपूर येथील दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशनद्वारे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादकीय सल्लागार राजेंद्र काळे यांच्यासह जिल्ह्यातील सहा पत्रकारांचा समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आज (दि.२६) शेगाव येथील विश्रामगृह येथे हा सन्मान सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून साहित्य लेखिका श्रीमती मायाताई दामोदर, पतंजली ग्रामोद्योग न्यास हरिद्वारचे महेश दिपके, महानगरपालिका गटनेता राजेश मिश्रा, दर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील पांडे, राष्ट्रीय सचिव संजय तिवारी, पोलीस टाईम २४० चे मुख्य संपादक राजेंद्र पाठक मुख्य, राजेश शुक्ला राष्ट्रीय उपाध्यक्ष दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अकोला जिल्हाध्यक्ष उषाताई वाकोळे, क्षेत्रीय मराठा फाउंडेशनचे अमित गुंजकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
या मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, लोकमतचे हॅलो हेड प्रमुख सदानंद शिरसाट, क्राईम रिपोर्टर धनराज ससाने, झी २४ तासचे प्रतिनिधी मयूर निकम, बुलडाणा लाईव्हचे संपादक कृष्णा सपकाळ, दै.महाभूमीचे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते पाटील यांचा ‘दर्पण समाजसेवा’ गौरव पुरस्काराने तसेच जिल्ह्यातील समाजसेविका सौ. ज्योती बावस्कर सौ रंजना चव्हाण सौ. जयश्री देशमुख, शिवाजीराव जाधव, सौ. शुद्धमती निखाडे यांचा प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शेगाव येथील देशोन्नती पत्रकार राजेश चौधरी, पत्रकार अनिल उंबरकर, बबलू देशमुख, सचिन बोहरपी भुसारी साहेब यांचेसह इतर गणमान्य व्यक्तीची उपस्थिती होती.