बुलढाणा (प्रशांत खंडारे) – राज्यात पशुधनाला लम्पी आजाराने विळखा घालत असताना, जिल्ह्यात १४ जनावरे बाधित झाल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने वरिष्ठांना पाठविला आहे. तत्पूर्वी पशुसंवर्धन विभागाने मोहीम राबविल्याने लम्पीला वेसण लागले. या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनीदेखील लम्पीचा प्रभाव वेळीच बाशिंग रोखण्यासाठी लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन करून शेतकर्यांनो घाबरू नका, शासन आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली.
जिल्ह्यामध्ये लम्पीसदृश्य आजाराचे आजपर्यंत देऊळगाव राजा ४, मेहकर ६ व लोणार ०४ असे एकूण १४ जनावरे बाधित झाल्याबाबतचे क्षेत्रीय अधिकारी यांनी अहवाल पाठवला आहे. सादर जनावरांचा रक्तजल व त्वचा गाठीचे नमुने तपासणीसाठी रोग अन्वेषण विभाग अकोला यांच्याकडे पाठविले आहे. दरम्यान, जनावरांशी संबंधित असलेला लंपी आजार पुन्हा डोके वर काढत असल्याने, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात हा आजार वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील संपूर्ण पशूंचे जलदगतीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बळीराजावरील संकट कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. कोरोना काळापासून सातत्याने बळीराजावर संकटाची मलिकाच सुरू आहे. एका मागून एक येणार्या संकटामुळे जिल्ह्यातला शेतकरी आधीच हतबल झालेला आहे. लंपीनंतर खरीप पेरणीदरम्यान उशिरा पाऊस आल्याने अनेकांच्या प्रेरणा खोळंबल्या. तर घाटाखालील काही तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती रखडून गेली. या संकटातून शेतकरी यांना उभारणी मिळत नाही तेच जिल्ह्यात पुन्हा एकदा लंपी आजार डोके वर काढत आहे. मागील काळात सदर आजाराने जिल्हाभरात थैमान घातले होते. हजारो शेतकर्यांची पशु या आजाराने ग्रस्त झाले होती. अनेक शेतकर्यांच्या पशुचा मृत्यु झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होत. आता पुन्हा राज्यभरातील अनेक जिल्ह्यात लांबीचा प्रभाव वाढत असल्याने शेतक-यात धडकी भरली आहे. सदर आजार जिल्ह्यात पुन्हा वाढू नये, यासाठी सावधगिरी म्हणून पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच पशुंचा तत्काळ लसीकरण करण्यात यावे, व शेतकर्यांना दिलासा देण्यात यावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांच्यावतीने करण्यात आली आहे.
शासन आपल्या पाठीशी !
जिल्ह्यातील शेतक-यांवर किती ही संकट येवो शेतक-यांनी घाबरुन जावू नये. सध्याचे शासन हे पारदर्शक असून, शेतक-यांच्या परिस्थितीची त्यांना जाण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने राज्यातील शेतक-याच्या प्रश्नावर गंभीर असतात. शेतक-यांच्या प्रश्नांना शासन प्राधान्य देत आहे, त्यामुळे कोणत्?याही प्रकारची चिंता करु नये, शासन आपल्या पाठीशी आहे.
– संजय गायकवाड, आमदार बुलढाणा विधानसभा मतदारसंघ