– चंद्रावर पोहोचताच चंद्रयानचा संदेश : ‘मी माझे ध्येय साध्य केले!’
– ‘आता चांदोमामा लांबचे नाहीत’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी; शास्त्रज्ञांचेही केले कौतुक
– चंद्रयान-३ चे यशस्वी सॉफ्ट लॅण्डिंग होताच देशात ‘दिवाळी’!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – आज २३ ऑगस्टच्या सायंकाळी चंद्रावर जसा सूर्य उगवला तसे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)च्या चंद्रयान-३ने आपले यशस्वी पाऊल चंद्राच्या भूमीवर टाकले. चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहोचणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला असून, इस्त्रोने आज इतिहास रचल्याने देशात अक्षरशः दिवाळी साजरी झाली. चंद्रयान-३ने बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर पुढील २० मिनिटांत या यानाने चंद्राच्या अतिम कक्षेत प्रवेश केला व ६ वाजून ४ मिनिटांनी या यानाने यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण धृवावर आपले पाऊल ठेवले, व मी माझे ध्येय साध्य केले आहे, असा संदेश भारतवासीयांना दिला. हा संदेश मिळताच भारतासह जगभरातून टाळ्यांचा कडकडाट झाला. जगाने भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, दक्षिण आप्रिâकेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा देत, ‘आता आपले चांदोमामा फार दूरचे राहिले नाहीत’, असे मिश्कीलपणे सांगून, प्रत्येक भारतीयांच्या मनात असलेल्या चंद्राविषयीच्या भावनेला हात घातला. प्रत्येक भारतीय चंद्राला लहानपणापासून चंदोमामा म्हणून पाहात लहानचा मोठा झाला आहे, आणि त्याच्या दक्षिण धृवावर ऐतिहासिक पाऊल ठेवून भारताने इतिहास रचल्याने प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावली गेली आहे.
—
Celebration begins across the country
Andheri Railway station 🔥🔥
Jai Hind#Chandrayaan3 #IndiaOnTheMoon #चंद्रयान_3 pic.twitter.com/110vqri7pp
— Sheetal Chopra 🇮🇳 (@SheetalPronamo) August 23, 2023