MEHAKARVidharbha

संत निघाले संतांच्या भेटीला!

मेहकर (रवींद्र सुरूशे) – परमहंस श्री तेजस्वी महाराज श्रीक्षेत्र वरुडी येथून दरवर्षी भव्य असा पायी दिंडी सोहळा शेगाव येथे जात असतो. याहीवर्षी मोठ्या दिमाखात वरुडी ते शेगाव हा दिंडी सोहळा शेकडो भाविकांना सोबत घेऊन श्री संत गजानन महाराज शेगावकडे २३ ऑगस्ट रोजी निघाला आहे. अखंडपणे कोस-दरकोस मुक्काम करत सात दिवसांचा प्रवास करून दिनांक २९ ऑगस्टला हा दिंडी सोहळा शेगाव येथे पोहोचणार आहे.

संत श्री तेजस्वी महाराज म्हणजे एक अवलियाच, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, विदर्भात प्रतिशेगाव म्हणून या तीर्थक्षेत्राची ओळख आहे. आज देऊळगाव माळी येथे या वारकर्‍यांचे समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. वारकर्‍यांच्या भोजनाची व्यवस्थासुद्धा देऊळगाव माळी येथील सुभाष चाळगे, रमण जैन, गजानन मगर यांनी केली होती. यांना श्री पांडुरंग संस्थान तसेच गावकर्‍यांची सहकार्य लाभले. वरुडी ते शेगाव या पायी दिंडी सोहळ्याची हे बावीसावे वर्ष आहे. यानंतरचा पुढील मुक्काम मेहेकर येथे असून दिनांक २४ ऑगस्टला सकाळी सहा वाजता वारकरी पुन्हा शेगावकडे विरामस्थ होणार आहे. म्हणूनच म्हणतात, ‘संत निघाले संतांच्या भेटीला’..

या दिंडी सोहळ्याचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन श्री तेजस्वी महाराज संस्थान यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत असतात. वारकर्‍यांना आपल्या दिंडी वारीमध्ये कुठलीही बाधा येऊ नये, तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर व जानेफळ पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!